<
भडगाव वार्ताहर — तालुक्यातील गोंडगाव येथील कु. कल्याणी पाटील हिच्या हत्येच्या निषेधार्त भडगाव तहसिल कार्यालयावर सकल मराठा समाज न्याय समिती संयोजकांमार्फत दि. ४ रोजी ११ वाजेपासुन मुकमोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनाच्या प्रती भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे, जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा उपविभागीय प्रांत अधिकारी, भडगाव पोलीस निरीक्षक आदिंना देण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर सकल मराठा समाज न्याय समिती संयोजक यात लक्ष्मण गोविंदा पाटील घुसर्डी, डाॅ. आर एस मराठे भडगाव, शिवाजी नामदेव मराठे तारखेडा, चिंतामण बाजीराव पाटील मांडकी, मोतीलाल भिला नरवाडे, विठ्ठल नामदेव मराठे भडगाव, काशिनाथ वामन नरवाडे भडगाव, राजेंद्र पांडुरंग पाटील तारखेडा आदिंच्या सहया आहेत. भडगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे कि, गोंडगाव ता. भडगाव येथील तीसरीच्या वर्गात शिकणारी ९ वर्षीय बालिका कु. कल्याणी संजय पाटील हिच्या अमानुष कृत्य करुन खुन करणार्या आरोपीस व त्याला मदत करणार्या सह आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देउन फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच त्यांनी वापरलेल्या मोबाईल व साधनांची पडताळणी करण्यात यावी. या केसचे कामी विधीतज्ञ अँड. उज्वल निकम यांची
नेमणुक करावी.
या केसचे काम ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपींना तात्काळ शासनाकडुन पीडीत बालकेस न्याय मिळवुन दयावा. यासाठी दि. ४ रोजी भडगाव नगर परीषद मेन रोड पासुन ते भडगाव तहसिल कार्यालय असा मुकमोर्चा सकाळी ११ वाजेपासुन शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार आहे. व ठिय्या आंदोलनही करण्यात येईल.तरी आपल्या स्तरावरुन कार्यवाही व्हावी. असेही निवेदनात शेवटी नमुद केलेले आहे. यावेळी सकल मराठा समाज न्याय समिती संयोजकांचे इतरही वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देण्यात आली.