जळगाव – (प्रतिनिधी) – लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन तसेच राष्ट्रीय सेवा योजना कक्ष च्या वतीने मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम साजरा करण्यात आला.
जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी डॉ शाम सोनवणे यांनी आदिवासी दिन साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट केले तसेच प्राचार्य डॉ राकेश चौधरी यांनी बिरसा मुंडा यांचे प्रतिमेस मल्यारपण केले. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी विकास विभागाचे अधिकारी डॉ जुगल घुगे व डॉ कल्पना भारंबे यांचे सह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने *मेरी मिट्टी मेरा देश* या अभियानांतर्गत महाविद्यालय परिसरात तसेच महाविद्यालयाचे अंतर्गत क्षेत्र कार्य केले जाणाऱ्या गावांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राकेश चौधरी, रासेयो विभागाचे डॉ अशोक हनवते, डॉ भारती गायकवाड, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ जुगल घुगे, डॉ कल्पना भारंबे महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ वाय जी महाजन, ग्रंथपाल तथा नेचर क्लबचे समन्वयक किशोर भोळे, गायत्री अत्तरदे व इतर सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.