<
लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
लोहारा येथून जवळच असलेल्या कळमसरा येथील राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) ग्रामपंचायत सरपंच अशोक चौधरी यांच्यावर नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता मात्र या ठरावाला एक मत कमी पडल्याने हा ठराव बारगावला असून सरपंच पद अशोक चौधरी हे कायम आहेत.
कळमसरा ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादीचे अशोक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्य निवडून आले होते. तर भाजपचे तीन सदस्य आहेत मात्र भाजपच्या गटांने त्यांना पळवून नेले होते. राष्ट्रवादीचे सहा अधिक भाजपचे तीन असे एकूण नऊ सदस्यांनी अशोक चौधरी यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता.परंतु अविश्वास ठरावाच्या बाजूने कायद्याच्या दृष्टीने 13 पैकी दहा सदस्यांचे मतदान अपेक्षित होते. एक मत कमी पडल्याने हा ठराव पारित झाला नाही. सरपंच अशोक चौधरी यांनी मंत्रालयात विविध मंत्री महोदयांकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले आहे म्हणून त्यांना शासकीय कामांचा प्रदीर्घ अनुभव आहे. गाव पातळीवर फोडाफोडीचे राजकारण करून भाजपने विकास कामात खिळ घालण्याचा प्रयत्न केला परंतु अखेर विजय सत्याचा झाला अशी प्रतिक्रिया सरपंच अशोक चौधरी व त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष वंदनाताई चौधरी यांनी दिली.