<
फैजपूर: आज दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर येथे विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सण उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे ‘जागतिक आदिवासी दिवस’ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. ताराचंद सावसाकडे यांनी स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष उजळले असताना आदिवासी समाजाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही याबाबत खंत व्यक्त केली,आज ही आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, आदिवासींच्या विविध चाली रिती व रूढी परंपरा ह्या निसर्गाचे संरक्षण आणि संगोपन करताना दिसतात म्हणून देशाच्या शाश्वत विकासासाठी आदिवासी संस्कृतीतील काही गोष्टी निश्चितच मार्गदर्शक ठरू शकतात असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए.आय. भंगाळे यांनीही आदिवासी समाजात प्राचीन काळापासून आजपर्यंत ज्या ज्या हुतात्म्यांनी समाजासाठी व राष्ट्राच्या जडणघडणीसाठी योगदान दिले अशा अनेक हुतात्म्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
प्रसंगी मंचावर उपप्राचार्य डॉ. एस.व्ही.जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे,डॉ.अचल भोगे आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विजय सोनजे, सूत्रसंचालन राष्ट्रीय सण उत्सव समिती प्रमुख डॉ.मारुती जाधव यांनी व आभार डॉ.डी.एल.सूर्यवंशी यांनी मांनले,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.दीपक सूर्यवंशी, प्रा.शेरसिंग पाडवी, प्रा.शिवाजी मगर,श्री.कन्हैया चौधरी, श्री.शेखर महाजन विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.