<
कवित्री बहिणाबाई चौधरी जयंती आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळा संपन्न
जळगाव शुक्रवार दिनांक 11ऑगस्ट 2023:-
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे केले होते . प्रस्तुत कार्यक्रम आयोजनाबाबत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा कडून प्राप्त झालेल्या पत्र अन्वये लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव आणि शिरीष मधुकरराव चौधरी विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जेवण कार्याविषयी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी सर आणि प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे सर उपस्थित होते . तर प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर नितीन बडगुजर हे उपस्थित होते .
याप्रसंगी डॉ. नितीन बडगुजर (जिल्हा समन्वयक, रा. से. यो. क.ब. चौ. उ. म.वि.जळगाव) यांच्या व्याख्यानाचे आयोजन समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना प्रमुख व्याख्याते डॉ. बडगुजर सर यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.
“अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके, मग मिळते भाकर”
ही कविता सादरीकरण केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांना तारुण्यामध्येच वैधव्य प्राप्त झाले होते. तरीसुद्धा त्या न डगमगता खंबीरपणे उभे राहून आपल्या मुलाबाळाचा सांभाळ केला. इतकेच नाही तर त्यांनी अनेक स्वरूपाच्या कविता रचना सुद्धा केल्या . असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ” प्र.के. अत्रे यांनी वर्णन करताना कवयित्री बहिणाबाई यांची महती सांगताना म्हणाले होते की , बहिणाबाईने रचलेल्या काव्यामधली जी काही शब्दरचना आहे. त्या संपूर्ण शब्दरचनेमध्ये मानवी जीवनाचा सार आहे” असे प्रतिपादन केले.
तत्पूर्वी सदर कार्यक्रम प्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राकेश चौधरी सर आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे सर यांच्या शुभहस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण केले. डॉक्टर अशोक हनवते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रम प्रसंगी शिरीष मधुकरराव चौधरी विज्ञान महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षण तर कर्मचारी आणि मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक , प्राध्यापकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवक विद्यार्थी तसेच इतर विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.