जळगाव – (प्रतिनिधी) – येथील मुक्ताई कॉलनी परिसरातील एस.एम आय टी कॉलेज मैदानावर स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रथम पाहुण्यांचे व ज्येष्ठ नागरिकांचे टाळ्या वाजून स्वागत करण्यात आले. आर्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदीप दादा रवींद्र पाटील, डॉ. संभाजी देसाई, डॉ.सुनील कोतवाल प्रकाश पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून सरस्वतीचे पूजन करण्यात आले.स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण श्री.संदीप रविंद्र पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीत सादर करून झेंड्याला मानवंदना दिली प्रमुख पाहुणे डॉ.संभाजी देसाई यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य दिनाची ऐतिहासिक माहिती देऊन मुलांना सक्षम करण्याविषयी मार्गदर्शन करुन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कवी प्रकाश पाटील यांनी ए मेरे वतन के लोगो हे देश भक्ती पर गीत सादर केले. सूत्रसंचालन फिलीप गावित यांनी केले मुख्याध्यापक अमोल कोल्हे यांनी आभारप्रदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते आकाशात ऑक्सिजनाचे फुगे सोडण्यात आले. यावेळी मुलांनी वंदे मातरम व भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. कार्यक्रमासाठी सौ. सविता पाटील, अविनाश सरदार, अश्विनी पाटील, ललिता पाटील, तसेच ज्येष्ठ नागरिक अमृत पाटील,पंढरीनाथ साळुंखे,शांताराम पाटील,राजाराम पाटील,रवींद्र देशमुख,अरुण पाटील,दिनेश सुरसे विजय पाटील, बाळूभाऊ यांनी सहकार्य केले. मुलांना शेवटी खाऊ वाटप करण्यात आले.ज्येष्ठांना चहापाणी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.