Thursday, March 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते “आयुष्यमान भव’ योजनेचा शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/09/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते “आयुष्यमान भव’ योजनेचा शुभारंभ

जामनेर – (प्रतिनिधी) – केंद्र सरकार च्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात “आयुष्यमान भव” मोहिमेचा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधना ताई महाजन यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत महाजन,डॉ.पल्लवी राऊत,डॉ.वैशाली महाजन,डॉ.नरेश पाटील,डॉ.मनोज पाटील व जळगांव येथील नेत्रविभाग, अस्थीविभाग, मानस उपचार तज्ञ उपस्तीत होते.

तालुक्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत “आयुष्यमान भव” मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेमध्ये अबाल वृद्धांच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहे.आयुष्यमान आपल्या दारी या उपक्रमाद्वारे तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थींची नोंदणी करून त्यांना आयुष्यमान गोल्डन कार्ड चे वितरण करण्यात येणार आहे. हे कार्ड असलेल्या लाभार्थींना नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.
तीस वर्षावरील नागरिकांची रक्तदाब, रक्तातील साखर,कॅन्सर यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. टीबी व कुष्ठरोग बाबत शिबिरे घेऊन रुग्ण शोधण्याचे काम करण्यात येणार आहे. डोळ्यांची तपासणी तसेच सर्व प्रकारचे ऑपरेशन याअंतर्गत मोफत करण्यात येणार आहेत.
आर बी एस के टीमकडून विशेष मोहीम राबवून सर्व अंगणवाडी व प्राथमिक, माध्यमिक शाळांतील मुलां मुलींची 32 प्रकारच्या सामान्य आजाराच्या तपासण्या करण्यात येणार आहेत.तसेच जल्म जात विकृती किंवा हृदयात छिद्र,किंवा डोळ्यात तिरडेपणा किंवा इतर विकृती च्या शस्त्रक्रिया साठी मुंबई व पुणे येथे संदर्भित करण्यात येणार आहे.

अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत “आभा”कार्ड काढण्यात येणार आहेत.जेष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच मानसिक आरोग्य तपासणी सुद्धा या कालावधीत करण्यात येणार आहे. “तालुक्यातील नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा शिबिराच्या ठिकाणी आरोग्य तपासणी करूनआरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जैन इरिगेशनची ‘फिनिक्स’ भरारी – अनिल जैन

Next Post

जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा

Next Post
जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा

जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d