<
लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
येथील श्री रामकृष्ण हरी मंदिर येथे माणुसकी समूहातर्फे गीते डेंटल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल शेंदुर्णी संचालक डॉ. महेंद्र गीते यांच्या वाढदिवसानिमित्ताने ३१ झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की आज वाढदिवस म्हटला की विनाकारण खर्च केला जातो, तो केक, गाजावाजा या गोष्टीला फाटा देत माणुसकी रुग्णसेवा समूह वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सदस्यांचा वाढदिवस साजरा करत असतात यामधे डॉ.महेंद्र गीते यांच्या वाढदिवसा निमित्ताने लोहारा या आपल्या गावातील श्रीरामकृष्ण हरी मंदिरामध्ये झाडांचे वृक्षारोपण करून वेगळा आदर्श समाजासमोर प्रस्थापित केला. या वृक्षांमध्ये बेल ,आंबा ,मोगरा ,चाफा, पिंपळ,अशोका, सप्तपर्णी, अशा प्रकारचे वृक्ष लावण्यात आले ,दरवर्षी वाढदिवसाला वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माणुसकी समूहाचे निस्वार्थी कार्य पाहून मी प्रेरित झाल्याचे डॉक्टर महेंद्र गीते यांनी यावेळी सांगितले.माणुसकी समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनीही वृक्षारोपण ही काळाची गरज हे समजावून सांगितले. यावेळी माणुसकी ग्रुप सदस्य डॉ.महेंद्र गीते, (गीते डेंटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक),डॉ ज्ञानेश्वर चव्हाण (दंत रोग तज्ञ ,नायर हॉस्पिटल मुंबई )रवींद्र कलाल, श्रीराम कलाल,गजानन क्षीरसागर,कडूबा चौधरी,स्वरा क्षीरसागर उपस्थित होते.
महाराष्ट्रात १९७२ नंतरचा सर्वात भिषण दुष्काळ सध्या जानवू लागला आहे. दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजन शून्य कृतिचा परिणाम आहे असे बोलले जात आहे.कोरोनामुळे आज आपल्याला कुठे झाडांचे महत्त्व कळायला लागले आहे एका आँक्सिजन सिलेंडर चे हजारो रुपये देवुन सुध्दा मिळाले नाही. पन वृक्ष आणि वन याच महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगीतले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले संभाव्य धोके रोखण्यात मानवाला यश मिळेल आणि त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल.वनसंपदा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ही जीवसृष्टीला लाभलेली देणगी आहे. जंगलसंपदा ही मानवी संपत्ती आहे तेंव्हा ‘वनश्री हीच धनश्री। वृक्ष लावू घरोघरी।।’ हा ध्यास प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.