<
लोहारा ता.पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची १०५वी वार्षीक सर्वसाधारण सभा दि. २४/९/२०२३ रोजी येथील माळी समाजाच्या मंगल कार्यालयात संस्थेचे तरुण तडफदार चेअरमन सुनिल पुंडलीक क्षीरसागर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली .या वेळी लोहारा नगरीच्या ज्या ज्या मान्यवरांनी विविध क्षेत्रात कार्य करीत असताना गावाचे नाव रोषन केले. व वेगवेगळे पुरस्कार प्राप्त केले .तसेच अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केले आशा मान्यवरांचा स्मृती चिन्ह , शाल ,श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. या मान्यवरांमध्येलोहारा येथील कृषिभूषण विश्वासराव शेळके, अर्जुन भोई, शैलेश पालीवाल, अमोल सोनवणे, मुरलीधर जाधव , प्रा .डॉ गुणवंतराव शेळके, ओमकार शिंदे , कैलास सरोदे या मान्यवरां सह गुणवन्त विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
तसेच यावेळी संस्थेचे माजी चेअरमन व जेष्ठ भाजपा कार्यकर्ते शरद आण्णा सोनार यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली .तर संस्थेचे सचिव रमेश शेळके यांनी अहवालाचे वाचन केले .
तसेच पुढील वर्षा मध्ये संस्थे कडुन सुरू करण्यात येणाऱ्या जेनेरिक मेडिकल व महा ई सेवा केंद्र या बद्दल माहिती दिली. व लवकरच संस्थे मार्फत गॅस एजन्सी व पेट्रोल पंप सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
या कार्यक्रमात कृषी भुषण विश्वासराव शेळके यांनी त्यांचा संस्थे कडून करण्यात आलेल्या गौरवा बद्दल उत्तर देताना त्यांनी ‘ सदर गौरव हा माझा नसुन तो शेतकरी व मजुर वर्गाचा असल्याचे सांगितले ” तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान घरच्या कुटुंबाला लागेल एव्हडी पिके व भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने करावा असे आवाहन शेतकऱ्यांना केले .
या सभेला सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, पोलीस पाटील सुरेंद्र शेळके ,बाबुलाल दगडू बोरसे,लक्ष्मण रामचंद्रन माळी, डॉ सुभाष घोंगडे, माणिक वामन निकुंभ ,युवराज बापु पाटील ,अशोक क्षिरसागर, आबा चौधरी,दत्तुआण्णा माळी, व सर्व संचालक मंडळ,दिशा लाईव्ह न्यूजचे कार्यकारी संपादक कृष्णराव शेळके तर मार्गदर्शक महेंद्र शेळके ,रमेश चौधरी ,दीपक पवार, ईश्वर देशमुख , लक्ष्मण बाविस्कर , कैलास चौधरी, माणिक शेठ कासार यांचे सह बहुसंख्य शेतकरी सभासद हजर होते . सभेचे प्रस्थाविक संजय सुर्वे सर यांनी केले .
लोहारा विकासोने या वर्षांपासून जो गावातील मान्यवर गुणवंतांचा सत्कार केला..त्यामुळे गावातूनही विकासो चेअरमन, व्हा चेअरमन, सदस्य यांचेही कौतुक होत आहे.यापुढेही असेच कार्यक्रम विकासो ने राबवावेत असे मत गावांतील मान्यवरांनी व्यक्त केले.