Friday, July 18, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/10/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि.३० (प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजसा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंती निमित्ताने आयोजीत ‘अहिंसा सद् भावना शांती यात्रा’ २ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून निघून पंडीत जवाहरलाल नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ. हेडगेवार चौक, नवीन बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रा येईल. या सद्भावना शांती यात्रेत पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. माहेश्वरी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव महानगर पालिकेच्या प्रशासक सौ. विद्या गायकवाड, के.सी. ई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर आदी मान्यवर निमंत्रीत आहेत. सोबत शहरातील नागरिक व विद्यार्थी हजारोच्या संख्येने यात सहभागी होणार आहेत.

रॅलीनंतर महात्मा गांधी उद्यानात होणाऱ्या विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये मा. श्रीमती अनुराधा शंकर अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) मध्यप्रदेश ह्या प्रमुख अतिथी असून, अध्यक्ष म्हणून मा. श्री. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थितीतांना गांधीजींचे पणतु मा. श्री. तुषार गांधी हे अहिंसेची शपथ देणार आहेत. शहरातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेत’ सहभागी होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि शाश्वत जीवनाच्या दिशेने पुढे जाऊ या, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी केले आहे.

चरखा जयंती निमित्त अखंड सूत कताई

महात्मा गांधींनी चरखा किंवा चरखा हे राजकीय मुक्तीसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरून, ‘प्राचीन कार्य नीतिमत्तेचे’ रूपक म्हणून आणि ब्रिटिश राजवटीला आर्थिक आणि सामाजिक प्रतिक्रियेचे प्रतीक म्हणून वापरले. २ ऑक्टोबर ह्या दिवशी चरखा जयंती ही साजरी केली जाते त्या निमित्ताने गांधी तीर्थ येथे अखंड सूत कताई होणार आहे. महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने गांधीतीर्थ सुरू राहणार आहे.

खानदेश में महात्मा गांधी पुस्तकाचे प्रकाशन

महात्मा गांधीजींचे व्यक्तिमत्व आज त्रिखंडात सर्वमान्य झाले आहे. या देशातल्या पहिल्या ग्रामीण कॉंग्रेस अधिवेशनाचा मान खानदेशातील फैजपूर नगरीला लाभला. गांधीजी म्हणत की, महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. खानदेशात गांधीजी आलेत व खानदेश गौरवान्वित झाला. लोकमान्य टिळक फंडाच्या निमित्ताने गांधीजी खानदेशात आले तेव्हा त्यांचे कमालीच्या उत्साहात सर्वत्र स्वागत झाले. मानपत्रे व भेटवस्तु देण्यात आल्यात. त्यांचा लिलाव करून ती रक्कम फंडात जमा झाली. वेगवेगळ्या संस्थांना, सामाजिक उपक्रमांना, व्यावसायिकाना भेटून गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्याची मशाल तेवती राखली. यात आबालवृध्द स्त्री-पुरुषांचा उत्कट सहभाग होता. अशा अनेक घटनांची नोंद असलेल्या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण

गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी कांताई सभागृहात गांधीतीर्थद्वारे देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. इ. ५ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेतील विजेत्यांना कार्यक्रमानंतर लगेचच पारितोषिके देखील मान्यवरांच्याहस्ते प्रदान होणार आहेत. या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनी माहिती अधिकाराची माहिती स्वत:हून जाहीर करावी -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना

Next Post

राज्यात जनसहभागातून स्वच्छतेचा जागर;राज्यातील ग्रामीण भागात सुमारे ५६७८६ उपक्रमांचे नियोजन

Next Post

राज्यात जनसहभागातून स्वच्छतेचा जागर;राज्यातील ग्रामीण भागात सुमारे ५६७८६ उपक्रमांचे नियोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications