<
जळगाव-(प्रतिनिधी) – तालुक्यातील कंडारी येथील वाघुर धरण परिसरात मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले ,मा. माजी आमदार व मनसे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त हे मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते .
या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महाराष्ट्र मच्छीमार सहकारी संस्था जळगाव व कृषी तंत्र विद्यालय,डिक्साई यांनी केले होते. .त्यानिमित्त मत्स्य व्यवसायाबद्दल विविध माहिती देण्यात आली. जसे युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे , मत्स्य व्यवसायाची संबंधित प्रधानमंत्री मत्स्यसंपदा अंतर्गत शासनाच्या योजनांची माहिती देणे,मत्स्य व्यवसायाला मिळणा-या अनुदानाबद्दल माहिती देणे, मत्स्य व्यवसाय करतांना घ्यावयाची काळजी व वाघूर धरणाच्या गावालगतच्या तरुणांना मत्स्य व्यवसायातून रोजगार उपलब्ध कसा करता येईल याबद्दल माहिती देण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मधुकर धनगर, माजी पंचायत समिती सदस्य कैलास सुर्वे, पोलीस पाटील मल्हारराव देशमुख, माजी उपसरपंच श्री अनिल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य श्री अविनाश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य श्री मिठाराम धनगर, श्री बाळू धनगर, सुधाकर सोनवणे, राजू शेख पटेल, श्री गोपाल रिवाज कर, शामभाऊ निकम यांची उपस्थिती लाभली.
मच्छीमार हा पारंपारिक व्यवसाय असला तरी आधुनिक प्रशिक्षण या बाबतीतली परिपूर्ण युवक-युवतींना देण्यात आली . या कार्यक्रमानिमित्त जमलेले कंडारी गावातील ग्रामस्थ सरपंच ग्रामसभा सदस्य जामनेर व भुसावल तालुक्यातील रहिवासी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते माजी आमदार ॲड. श्री जयप्रकाश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी ह्या कार्यक्रमाच्या आयोजन केले होते, त्यानिमित्त डिक्साई गावातील कृषी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल बाविस्कर, आशिष सपकाळे ,सिमा पाटील,रसिका बगळे,आशुतोष जाधव, साहेबराव महाजन, संजय मोती, यांनी परिश्रम घेतले.
प्रशिक्षण अजित बनसोडे यांनी दिले तर सूत्रसंचलन समाधान ठाकरेंनी केले.