<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी व कृषि विज्ञान केंद्र व आत्मा, ममुराबाद फार्म, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक ०४/१०/२०२३ ते ०९/१०/२०२३ या दरम्यान ६ दिवशीय अनिवासी “कुक्कुटपालन व व्यवस्थापन” विषयी ग्रामीण युवकांसाठी कौशल्य विकास (STRY) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समारोप श्री.गणेश चाटे (उपायुक्त, म.न.पा.जळगाव), श्री.संजय जगताप (जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव) व श्री.युनुस तडवी (जिल्हा प्रकल्प अधिकारी, बार्टी जळगाव) यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला; क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून समई पेटवून समारोप कार्यक्रमाची सुरुवात झाली. समारोप एक नवीन पर्वा ची सुरुवात होते व प्रशिक्षणार्थी आता नव उद्योजक झाले याची साक्ष देत होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत कृषी विज्ञान केंद्र चे शास्त्रज्ञ डॉ.हेमंत बाहेती सर व शास्त्रज्ञ किरण मांडवडे सर यांनी केले. तदनंतर डॉ.हेमंत बाहेती सर यांनी प्रास्ताविक सादर केले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे श्री.संजय जगताप (जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री.युनुस तडवी (जिल्हा प्रकल्प अधिकारी, बार्टी जळगाव) यांनी “युवकांनी उद्योग क्षेत्रात आपले भवितव्य उज्वल करावे” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यानंतर श्री.गणेश चाटे (उपायुक्त, म.न.पा.जळगाव) यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. बार्टी मार्फत समतादूत कल्पना बेलसरे व समतादूत शिल्पा मालपूरे यांनी मनोगत व्यक्त केले व सर्व प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणाबाबत आपापले अनुभव सांगितले. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
सदरील प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी प्रमुख कृषी विज्ञान केंद्र चे डॉ. हेमंत बाहेती सर व किरण मांडवडे यांचे विशेष अभिनंदन व आभार बार्टीकडून जळगाव जिल्हा प्रकल्प अधिकारी व सर्व समतादूत टिम यांनी केले.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र येथील कर्मचारी वृंद, जळगाव व जिल्हा प्रकल्प अधिकारी, समतादूत टिम बार्टी यांनी परिश्रम घेतले तसेच मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थींनी ही पुर्ण दिवस उपस्थित राहून सहकार्य केले. सर्व मान्यवरांचे आभार कृषी विज्ञान केंद्र मार्फत शास्त्रज्ञ श्री. किरण मांडवडे सर यांनी आभार मानले.