Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिवाळीच्या सुट्ट्या दिवाळीतच द्याव्यात-एनमुक्ताची आग्रही मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/10/2023
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
दिवाळीच्या सुट्ट्या दिवाळीतच द्याव्यात-एनमुक्ताची आग्रही मागणी

जळगाव – (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने वार्षिक नियोजनानुसार दिवाळी/ हिवाळी सुट्या या दिनांक 17 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तसेच दिवाळीच्या पाच दिवस सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत या दोन्हीही सुट्या सलग देण्यात याव्यात या संदर्भात आज एन.मुक्ता.च्या वतीने एन. मुक्ताचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. त्यात निवेदन केले आहे की, दिवाळीच्या सुट्ट्या या प्राध्यापकांना दोन टप्प्यांमध्ये दिल्या जातात, त्या सलग देण्यात याव्यात. वास्तविकत: भारतीय संस्कृतीनुसार दिवाळी सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
त्यामुळे सणासुदीच्या काळात प्राध्यापकांना आपल्या कुटुंबासोबत राहता यावे, कुटुंबीयांसोबत सण साजरा करता यावा तसेच बहुतांश प्राध्यापक हे त्यांच्या गावापासून लांब नोकरीला आहेत त्यामुळे सणासुदीच्या काळात आपल्या कुटुंबियासोबत जास्तीत जास्त दिवस राहता यावे म्हणून प्रवासाचे नियोजन करणे देखील शक्य होते.

दिवाळीमध्ये सणाला अनुसरून सलग सुट्या देण्यात याव्यात त्याचप्रमाणे दिवाळी दरम्यान विद्यार्थ्यांच्या परीक्षा व सुट्ट्यांचा देखील खूप गोंधळ होतो. जर परीक्षा सलग राहिल्या तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून देखील ते सोयीचे होईल म्हणून सुट्ट्यांचे नियोजनात बदल करून विद्यार्थी व प्राध्यापक दोन्हींना सोयीचे होईल अशा पद्धतीने विद्यापीठाने सुट्ट्यांचे नियोजन करावे असे निवेदन विद्यापीठाचे प्र.कलगुरू डॉ.प्रा. एस.टी. इंगळे यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील, डॉ. भगवान चौधरी, प्राचार्य डॉ. एस आर पाटील, प्रा. डॉ. अमृत वळवी, प्रा. डॉ. सुरेश शेलार, प्रा. डॉ. नितीन बडगुजर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“युवकांनी उद्योग क्षेत्रात आपले भवितव्य उज्वल करावे” – युनुस तडवी यांचे कुक्कुटपालन प्रशिक्षणात प्रतिपादन

Next Post

समाजकार्याच्या विद्यार्थ्यांची कौटुंबिक न्यायालयास भेट

Next Post
समाजकार्याच्या विद्यार्थ्यांची कौटुंबिक न्यायालयास भेट

समाजकार्याच्या विद्यार्थ्यांची कौटुंबिक न्यायालयास भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo