<
जळगाव-(प्रतिनिधी) – दिनांक 10 ऑक्टोंबर 2023
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील एम एस डब्ल्यू प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची संस्था भेटी अंतर्गत जिल्हा कौटुंबिक न्यायालय, जळगाव येथे भेट देण्यात आली. संस्था भेटीचा उद्देश आणि महाविद्यालयाची माहिती प्रा. डॉ. शाम दामू सोनवणे यांनी उपस्थितांना करून दिली. कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाबद्दल विवाह समुपदेशक श्रीमती टोम्पे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख न्यायाधीश श्री पाठक सर यांनी कौटुंबिक न्यायालया अंतर्गत कायद्यांची माहिती देऊन विवाह, सहोदर नातेसंबंध, निशिद्ध नातेसंबंध, मुलांचे अधिकार, नुकसान भरपाई, घटस्फोट आणि या सर्व प्रक्रियेत समुपदेशकाची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते, याची सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे चर्चेच्या माध्यमातून देण्यात आले. कौटुंबिक न्यायालय हे समाजातील महिला आणि पुरुष यांच्या संविधानिक हक्कांची पायमल्ली होणार नाही, यासाठी दुवा म्हणून काम करत आहे. संस्था भेटीच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.शाम दामु सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ नितीन बडगुजर, क्षेत्रकार्य समन्वयक प्रा डॉ यशवंत महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांचे सहकार्य लाभले.