<
जळगाव – (प्रतिनिधी) – दिनांक 10 ऑक्टोंबर 2023
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील एम एस डब्ल्यू प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची संस्था भेटी अंतर्गत आधार बहुउद्देशीय संस्थेचे महिला व बाल सहाय्यता कक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसर, जळगाव येथे भेट देण्यात आली. संस्था भेटीचा उद्देश आणि महाविद्यालयाची माहिती प्रा. डॉ. शाम दामू सोनवणे यांनी उपस्थितांना करून दिली. महिला व बाल सहायता कक्ष च्या समन्वयक समुपदेशक श्रीमती विद्या सोनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांच्या व बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती दिली. समस्याग्रस्त बालके किंवा महिला ऑनलाईन पद्धतीने देखील सहायता मागू शकतात, यासाठी संपर्क क्रमांक सांगितले. महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन नुकसान भरपाईची तरतूद काय आहेत याबाबत सखोल चर्चा केली.
महिला व बाल सहायता कक्षाच्या कामकाजाबद्दल समुपदेशक नेहा पवार यांनी सखोल माहिती दिली. संस्था भेटीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश आहिरे या विद्यार्थ्याने तर आभार प्रदर्शन पूजा कुमावत या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ नितीन बडगुजर, क्षेत्रकार्य समन्वयक प्रा डॉ यशवंत महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांचे सहकार्य लाभले.