<
जळगाव – (प्रतिनिधी) – दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ मंगळवार :- धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव महिला मंचच्या या विभागांतर्गत ताण तणाव व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी मंचावर जळगाव येथील प्रमुख वक्त्या प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. कांचन नारखेडे , कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी , महिला मंच समन्वयक डॉ. सुनीता चौधरी , डॉ. कल्पना भारंबे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. सुनीता चौधरी यांनी महिला मंच या उपक्रमांतर्गत मुलींच्या सर्वांगीण कला गुणांना वाव मिळावा या साठी या महिला मंचची स्थापना केली आहे.
ताण तणाव व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन करताना. ताण तणाव हा आपल्या सर्वांनाच असतो. परंतु त्याचे आपल्याला व्यवस्थापन करता आले पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले. व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन करताना त्यांनी ताण म्हणजे काय हे समजून सांगितले . त्याचबरोबर ताण तणाव यांची लक्षणे समजून सांगितली. ज्यामध्ये रागावणे , झोप न लागणे, डोकेदुखणे, पोटदुखी होणे, कोणत्या हालचाली करावेसे न वाटणे , विश्रांती न मिळणे, वेगळ्या स्वरूपाच्या चिंता असणे, हे ताण तणावाची लक्षणे आहेत . असे त्यांनी सांगितले. माणसाने आपले शरीर , मन भावना आणि वर्तन हे ताण आल्यानंतर बदल होतो . म्हणून आपलं शरीर व्यवस्थित काम करू शकत नाही. व्यक्तीच्या भावना भडकत असतात . किंवा भावनावरती नियंत्रण राहत नाही. त्यामुळे माणसांमध्ये वेगळ्या स्वरूपाचे चिडचिडेपणा किंवा शारीरिक दृष्टिकोनातून वर्तनामध्ये बदल जाणवतात . असे त्यांनी सांगितले. म्हणून आपण अतिशय ताण घेता कामा नये प्रत्येक व्यक्तीला थोडाफार का सेना ताण असावाच. परंतु तो सुद्धा नियंत्रणात असावा.
ताणतणाव यावर उपाययोजना करताना डॉ. नारखेडे यांनी महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या . काही गोष्टीकडे अनावश्यक घटकाकडे दुर्लक्ष करावे. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीला पर्यायी उत्तर म्हणून आपण तयारी असावे , त्यानंतर परिस्थितीशी निगडित गोष्ट आपण स्वीकारलेली असावी. त्या परिस्थितीला स्वीकारले असावे . अशा गोष्टीवर नियंत्रण ठेवल्यास आपल्याला व्यवस्थित राहता येईल अशी त्यांनी सांगितले. ताण तणाव याबाबत व्यवस्थापनाबाबत त्यांनी अधिक स्वरूपात माहिती विद्यार्थ्यांना अनेक कृती आणि प्रश्न यांच्या माध्यमातून दिली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी बॉटल हातात घेऊन सांगितले की, जर छोटीशी बॉटल असेल तर आपल्याला जास्त वेळ हातामध्ये पकडले तर आपल्याला नक्कीच ताण येतो आणि ती अधिकच जड वाटू लागते.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसंगी डॉ. राकेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानां त्यांनी सांगितले की, “तुम्ही जर मानसिक सुदृढ असाल तर तुमचा समाज देखील सक्षम बनू शकतो”. ताण हा मानसिक आरोग्याला अपाय करणार नाही. ताणतणाव निवारण आणि व्यवस्थापन करणे आपणास आवश्यक आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मंचच्या डॉ. सुनिता चौधरी यांनी केले तर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. कल्पना भारंबे यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापक इतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.