मुबंई – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा ४ था स्थापनादिन भिवंडीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक क्षेत्रात ज्यांचे विशेष कार्य आहे आशा समाजसेवकांच मार्गदर्शन सर्वांना लाभलं.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. ऍड. असीम सरोदे यांनी ऑनलाईन लोकशाही सोबत रोमान्स व वास्तव या विषयावर मार्गदर्शन केले तसेच रायगड भूषण श्री. संतोष ठाकूर व कामगार नेते श्री. संतोष पवार यांनी आदिवासी व कामगार तसेच ऍड. अमोल कांबळे व ऍड. शिरीष बोरकर यांनी उपस्थितीताना मार्गदर्शन केले.
अध्यक्ष सिद्धार्थजी इंगळे यांनी नवीन कोर टीम नेमुन मासुची संपुर्ण जबाबदारी त्या टीमला दिली आहे. त्या टीम मधे माझा ही समावेश आहे. तरी पुढील वाटचाल खडतर जरी असली तरी जिथे पोहचायचे आहे तिथे पोहचणारच हा निश्चय करून “महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन” अजुन जोमाने कार्य करणार असल्याचे आश्वासन संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी यावेळी दिली आहे.