<
लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
लोहारा -म्हसास रोडवर असलेल्या लघुपाटबंधारे विभागा अंतर्गत असलेल्या लोहारा धरणात अवैद्य पाणी उपसा करणाऱ्या लोकांवर आज दि. 21 रोजी पाटबंधारे विभाग शाखा अभियंता श्री किशोर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वप्निल महाजन वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पाटील साहेब तसेच लोहारा ग्रामपंचायत सरपंच अक्षयकुमार जैस्वाल मच्छीमार सोसायटी अध्यक्ष मोहन भोई यांच्या माध्यमातून धरणातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करण्यात आल्या आहे.
लोहारा या गावाला नियमित पाणीटंचाई सारखा प्रश्न दरवर्षी भेंडसावत असतो. मागील दोन महिन्यापर्यंत लोहारा गावाला टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर्षीही धरणात जेमतेम पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई जाणवू नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आणि यापुढेही अशीच कारवाई करण्यात येईल जनतेने सहकार्य करावे तसेच कोणी धरणातील पाणी उपसा करताना आढळल्यास त्वरित ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे सरपंच अक्षयकुमार जैयस्वाल यांनी सांगितले.
संयुक्त कारवाई वेळी सरपंच अक्षयकुमार जैस्वाल ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख , आबा चौधरी, अशोक क्षीरसागर, तंटामुक्ती अध्यक्ष अमृत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडबड चौधरी, पाटबंधारे खात्याचे मधुकर पाटील ,रमेश कोळी, दिनकर गीते, विक्रम विठ्ठल चौधरी ,ज्ञानेश्वर कोळी, विशाल दौलत चौधरी ,विनोद सुरेश कोळी ,सागर समाधान कोळी, मयूर सुरेश मोरे सागर संजय वाघमोडे ,ग्रामपंचायत कर्मचारी अर्जुन पाटील, ज्ञानेश्वर सरोदे, रतन चव्हाण, वीज वितरण कंपनीचे अशोक सुरवाडे, अविनाश राठोड ,गोपाल पाटील व संपूर्ण स्टॉप तसेच गावातील अनेक मान्यवर हजर होते .झालेल्या कारवाईचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. आणि यापुढेही अशीच धडक कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा गावातील मान्यवरांनी बोलून दाखवली तसेच काम कारवाई करताना पार्टी ,पक्ष, लहान, मोठा न बघता प्रामाणिकपणे कारवाई करत रहा असे लोहारा वासियांमध्ये बोलले जात आहे, व ग्रामस्थांकडून कारवाई बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.