<
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र जळगावच्या चाळीसगाव ब्लॉक मधील गणेशपूर गावात संलग्नित स्वयंसिद्ध युवती मंडळ, यूनीसेफ, एस.बी.सी-३ सक्षम प्रकल्प , माध्यमिक विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत गणेशपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशपुर गावात बालविवाह निर्मूलनासाठी जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये गावातील लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, युवक युवतींनी सहभाग घेत बालविवाह प्रतिबंधक जनजागृती साठी विविध घोषणा दिल्यात. प्रस्तुत रॅली माध्यमिक विद्यालयापासून सुरू झाली तसेच पूर्ण गावभर जनजागृती करत पुन्हा विद्यालयात समारोप करण्यात आला. तसेच जनजागृतीसाठी गावात ठिकठिकाणी पोस्टर्स चिटकविण्यात आले.
या कार्यक्रमाला माध्यमिक विद्यालय गणेशपूर मुख्याध्यापक श्री प्रकाश पाटोळे, पर्यवेक्षक लखन पाटिल, विशेष सहकार्य अरुण अहिरे, सरपंच चंद्रकांत साहेबराव पाटील, ग्रा. पं. सदस्य सूर्यभान पाटिल, पोलीस पाटिल भागवत पाटिल तसेच इतर गावकरी मंडळी जेष्ठ नागरिक, प्राथमिक आरोग्य केंद्र आशा वर्कर सरला पगारे यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला. प्रस्तुत कार्यक्रम नेहरू युवा केंद्र जळगांव जिल्हा युवा अधिकारी श्री. नरेंद्र, सक्षमचे प्रकल्प अधिकारी श्री नंदू जाधव, लेखापाल अजिंक्य गवळी तसेच तालुका समन्वयक शंकर पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसिद्ध युवती मंडळाच्या अध्यक्षा वैशाली शिंदे यांनी आयोजित केला होता. संपूर्ण कार्यक्रमाची रचना सक्षम प्रकल्पा द्वारे करण्यात आली होती. इथून पुढे गावात एकही बाल विवाह होणार नाही अशी ग्वाही उपस्थित लोकप्रतिनिधी, शिक्षक, मान्यवर अतिथी तसेच उपस्थित गावकऱ्यांनी दिली.