<
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे. शिवसेना पक्षाच्या-५३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीत शिवसेनेला ‘ठाकरे’ घराण्यातून निवडणूक लढविण्यासाठी नवीन चेहरा मिळणार आहे. तर आदित्य यांची उमेदवारी उद्या जाहीर होऊ शकते व ३ ऑक्टोबर रोजी शक्ती प्रदर्शनसह उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती आहे. तर कालच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पुढील मुख्यमंत्री हा सेनेचा असणार असा दावा देखील केला होता. तर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे.