Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हायटेक शेतीचा नवा हुंकार;जैन हिल्सवर कृषि महोत्सवाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/12/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव दि. ९ प्रतिनिधी – शेती संबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन बघण्याची संधी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त उपलब्ध होणार आहे. १० डिसेंबर २३ ते १५ जानेवारी २४ पर्यंत शेतकऱ्यांना जैन हिल्सवरील भव्य कृषी महोत्सवामध्ये हायटेक शेतीचा नवा मार्ग शोधता येईल. कृषीक्षेत्रातील जगात जे नव्याने तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने पिकांची प्रात्यक्षिके जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर उभी केली आहेत.

हायटेक शेतीचा नवा हुंकार असलेल्या जैन हिल्सवरील कृषी महोत्सवात गादीवाफ्यावर ठिबक संच बसवून एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड. क्रॉप कव्हरसह क्रॉपकुलिंग यंत्रणा तापमान वाढीवर नियंत्रणासाठी मिस्टर स्प्रिंकलर यंत्रणा, कापूस पिकात ठिबक मल्चिंग आणि गादीवाफाचा त्रिवेणी संगम, आंबा, चिकू, पेरू, सिताफळ, मोसंबी, संत्रा या फळझाडांची अतिसघन पद्धतीने गादीवाफ्यावर ठिबक संचावरती केलेली लागवड बघता येईल.. हवामान बदलांच्या संकटावरील उपाय म्हणून शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणात बागांची शेती किती गरजेची आहे हे अनुभवता येईल. जैन हिल्सवर शेडनेट व इनसेक्टरनेटमध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा यांची केलेली लागवड पाहायला मिळेल.

अवकाळीपासून केळीचे संरक्षण…

अवकाळी पाऊस, गारपीट यापासून बचाव व्हावा म्हणून शेडनेटमध्ये ग्रैन्डनैन व्हरायटी केळीची लागवड, गादीवाफा, दोन ठिबकच्या नळ्या आणि मल्चिंग असलेल्या बिगर हंगामी या केळीला पावणे सहा महिन्यात सर्व झाडांना घड पडले. बागेचे फ्रूट केअर मॅनेजमेंट कशी करता येते हे अभ्यासता येईल. मोकळ्या शेतात ग्रॅन्डनैन बरोबरच नेंद्रन, पूवन, बंथल व रेड बनाना या जातींची लागवडही पाहता येईल.

ठिबक, गादीवाफा व मल्चिंगवर पांढऱ्या व लाल रंगाच्या कांद्याच्या १५ जाती, लसुणच्याही १० जाती, हळदीच्या १९ जातींसह पपईच्या पाच जातींची लागवड कृषी महोत्सवात अभ्यासता येईल. पपईमध्ये हळद व आले ही आंतरपीके घेता येईल हा विश्वास निर्माण होईल. पॉलिमल्च करून गादीवाफ्यावर आधार देऊन व आधार न देता अशा दोन्ही पद्धतीने टोमॅटो व मिरचीची शेती अभ्यासता येईल.

जैन हायटेक प्लॉट फॅक्टरी टाकरखेडा येथे एरोपोनीक, हायड्रोपोनिक, भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, रोपवाटिका, दर्जेदार व रोगमुक्त रोपे कशी बनतात ते अभ्यासता येईल. परिश्रम समोर वेगवेगळ्या प्रकारचे ठिबक सिंचनाचे प्रात्यक्षिक व अद्यावत साधन सामुग्री व कृषी उपयुक्त अनेक गोष्टी पाहता येतील. मनात काही शंका, प्रश्न असतील तर कृषितज्ज्ञांशी सुसंवाद साधता येईल. कृषी महोत्सवात भेटीसाठी https://www.jains.com/farmers.meet/ या लिंकवर नोंदणी करता येईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड

Next Post

संसद भवन नवी दिल्ली येथे बैठकी साठी महाराष्ट्रातून चौघांची निवड

Next Post

संसद भवन नवी दिल्ली येथे बैठकी साठी महाराष्ट्रातून चौघांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo