<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील श्री सुनील वाणी ,भूषण लाडवंजारी,शिरीष तायडे व पिताबर भावसार यांची नवी दिल्ली येथील महिला व बालविकास मंत्रालय संसद भवन येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीस या चौघांची निवड झालेली आहे. संपूर्ण देशातून या बैठकीस निवडक 40 व्यक्तीची यात निवड करण्यात आली आहे.
यात निवड झालेल्या सुनील रामदास वाणी यांनी गेल्या 25 वर्षा पासून ते सामाजिक विविध विषयावर ते काम करत आहेत त्यांना नुकताच छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरण राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाला आहे तसेच जिल्हा परिषद चे प्रशिक्षक म्हणुन ते यशदा पुणे मार्फत जवाबदारी पार पाडत आहे
तसेच भूषण दिलीप लाडवंजारी हे देखील सामाजिक विषयावर गेल्या 15 वर्षापासून विविध विषयावर काम करत आहे त्यांना देखील राज्यशासनाच्या क्रीडा विभागाच्या जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे यांनी आता पर्यंत 25 हजारा पेक्षा जास्त अधिकारी पद अधिकारी याना प्रशिक्षण दिले आहेत. शिरीषकुमार भीमराव तायडे हे देखील त्यांच्या संस्थेच्या मध्मातून गेल्या 10 वर्षा पासून सामाजिक विविध विषयावर काम करीत आहे. नुकतीच त्यांची भाजपाच्या पदवीधर जिल्हा महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे याचं बरोबर पिताबार नारायण भावसार हे देखील गेल्या 10 वर्षा पासून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांना,स्त्रियांना कुपोषण मुक्त होण्यासाठी त्यांच्या आरोग्यावर काम करीत आहे .या चार व्यक्तींना
या बैठकीस महिला व बालकांवरील होण्याऱ्या अत्याचारा संदर्भात महत्व पूर्ण चर्चा होणार आहे.या दरम्यान राष्ट्रपती भवन येथे सुधा भेट देणार आहे. निवड झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना नवी दिल्ली ते मुंबई विमानाचे प्रवास भाडे व इतर खर्चही केंद्र शासनामार्फत होणार आहे. निवड झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्हाचे संकट मोचक मा गिरीष महाजन मंत्री महोदय, आमदार राजुमामा भोले भाजपा जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज तसेच भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला ताई बेंडाले यांनी सर्वांनी या चौघचे अभिनंदन या वेळी केले.