<
शेंदुर्णी, ता. जामनेर ;- धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव गरूड फाऊंडेशन आयोजित आचार्य गजाननराव गरूड स्मृती व्याख्यानमालेचे वर्ष पंधरावे पुष्प पहिले- आदर्श सरपंच मा.श्री भास्करराव पेरे पाटील (पाटोदा, छत्रपती संभाजीनगर) यांनी आदर्शगाव या विषयावर गुंफले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वालन व प्रतिमापूजन करून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.
श्री भास्करराव पेरे पाटील यांनी सांगितले कि, गावात अभिनव उपायांच्या माध्यमातुन टॅक्स संकलनामध्ये वाढ केली. त्यातून मोफत स्यानिटरी नॅपकिन, वर्षभर मोफत दळनाची सोय, घरोघरी नळ आणि सोलर व्दारे गरम पाणी उपलब्ध करून दिले. पाणी बचत, स्वच्छता, पर्यावरण पुरक उपक्रमांच्या माध्यमातून गावाचा विकास केला. स्वच्छ पाणी, वृक्षारोपण, शिक्षण, साफ सफाई, बाहेरचे खाणे टाळणे, निराधारांना आधार देणे हा आदर्श सर्वच गावांनी घेण्याची गरज आहे व गांधीजींच्या स्वप्नातील गावं निर्माण करायची आहे. सर्वांनी राजकारण न करता गावाच्या विकासासाठी एकोपा कायम ठेऊन काम केले पाहिजे.
प्रास्ताविकातून व्याख्यानमाला आयोजनामागची भूमिका प्राचार्य एस.पी.उदार यांनी मांडली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन श्री संजय गरूड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बापूसाहेबांनी आपल्या कार्यातून आपली ओळख निर्माण केली व गावाचे नाव मोठे केले हे सांगितले. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री सतीश काशीद, संचालिका सौ.उज्वला काशिद, संचालक श्री सागरमल जैन, संचालिका सौ. देवश्री काशिद, संचालक अभिजीत काशिद, ,श्री राजमल भागवत,श्री शांताराम गुजर, श्री सुधाकर बारी, प्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, सर्व पत्रकार बंधू, सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद, पालक, शेंदुर्णी नगरपंचायत चे मा. सदस्य, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री पी.जी. पाटील यांनी, तर आभार उपप्राचार्य प्रा. दीपक पाटील यांनी मानले.