जामनेर /प्रतिनिधी – प्रख्यात भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त देशात दरवर्षी दिनांक २२ डीसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. गणित या विषयातील क्षेत्रात गणिततज्ञ यांचे योगदान ओळखुन तसेच जीवनातील अनेक पैलूवर गणिताचे महत्त्व वाढविणे हाच खरा उद्देश या गणित दिनाचा आहे. श्रीरामानुजन यांनी लहान पणी उल्लेखनीय कामगिरी करीत गणीतीय विश्लेषण संख्या, सिद्धांत, इन्फिनिटी, सीरीज, यांचे महत्त्व पटवून दिले. श्रीनिवास रामानुजन यांच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने शहरातील अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या जिकरा इंग्लिश मेडीयम स्कूल व जिकरा उर्दू प्राथमिक शाळेत सांस्कृतिक तसेच सामाजिक त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जिकरा शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसुन ते एक उत्तम विद्यार्थी घडविण्याचे केंद्र बनले आहे. या शाळेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चांगला अनुभवी प्रेमळ शिक्षक वर्ग शिकविणारे शिक्षक आदर्श शिक्षिका यांचा समुह या शाळेत पहावयास मिळतो. चांगल्या शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न दिला जात असतो. विद्यार्थ्यांमधील खेळाडू व्रुत्ती, कलासंशोधक व्रुत्ती इ. बर्याच गुणांना वाव मिळवुन देण्यासाठी मंच तयार करून देणे यावर जास्तीत जास्त भर या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो.
त्यामधे विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य तसेच संस्कारीक जडण घडण वाढविण्यासाठी सामुहिक न्रुत्य स्पर्धा गायन स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती. आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी रंगमंचावर टॅलेंट तसेच आपल्या कला गुणांचे सादरीकरण करीत उपस्थित मान्यवरांचे मन जिंकून घेतले. स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस वितरण सचिव जाकिर शेख बाबु यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिकरा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष रहिम शेख बाबु यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव जाकिर शेख बाबु यांच्या हस्ते द्विपप्रज्वलन करीत करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर शेख कमरुद्दीन जनाब, एजाज खान, मजीद खान जनाब, जिकरा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शादाब सर, जिकरा प्राथमिक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मो. समीउर रहमान, क्रिडा शिक्षिका शिफा, शिरीन, शे. आसिफ, शे. हसन, शे. हुजैफा, आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.