Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मतदान जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/12/2023
in जळगाव, विशेष, सामाजिक
Reading Time: 1 min read
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मतदान जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव;- समाज कल्याण सहायक आयुक्त व आय. आर. जी. केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मतदान जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात जिल्हाभरातील मोठ्या संख्येने तृतीयपंथीय व्यक्तींचा सहभाग होता. मतदार जनजागृतीसाठी उपस्थित तृतीयपंथीय व्यक्तींच्या माध्यमातून ‘माझे मत – माझे भविष्य, मतदार राजा जागा हो – लोकशाहीचा धागा हो, नर असो वा नारी‌ – मतदान ही सर्वांची जबाबदारी, आपल्या मताचे दान- आहे लोकशाहीची शान, नवे वारे नवी दिशा -‌मतदानच आहे उद्याची आशा’ अशा विविध घोषणांच्या माध्यमातून तृतीयपंथीय व्यक्तींमध्ये मतदानाप्रती जनजागृती करण्यात आली.

अॅड. भारती भालेराव, समाज कल्याण तालुका समन्वयक जितेंद्र धनगर, महेंद्र पाटील, तृतीयपंथीय प्रतिनिधी भरत जोगी यांनी तृतीयपंथीयांमध्ये कायदेविषयक जनजागृती केली. तृतीयपंथीय समुदायामध्ये आप-आपल्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी नव्याने मतदान नोंदणी करणे, मतदानाप्रती तृतीयपंथीय व्यक्तींमध्ये उत्साह निर्माण होणे बाबत उपस्थित तृतीयपंथीय व्यक्तींना आवाहन करण्यात आले. तसेच तृतीयपंथीय समुदायाला लोकशाहीच्या परंपरेचे जतन, निष्पक्षपाती , निर्भयपणे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ दिली. वय वर्ष १८ पूर्ण केलेल्या भावी मतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी, तालुका समन्वयक व आर.जी.केअर सेंटरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले व परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Tags: jalgaon
Previous Post

कापसाला १० हजार रुपये हमी भाव व शेतकऱ्यांना पिकविमा भरपाई द्या – मनसे

Next Post

श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post
श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo