<
पारोळा;- येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात गणित विभागामार्फत गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरूवातीला पुष्कर मोरे या प्रथमवर्ष विज्ञान वर्गातील विद्यार्थ्याच्या हस्ते श्रीनिवासन रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.सदरप्रसंगी प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील , उपप्राचार्य डॉ.एस.बी.भावसार, डॉ.जी.पी.बोरसे, डॉ.ए.एम.पाटील गणित विभाग प्रमुख डॉ.एस.एन.साळुंखे उपस्थित होते.डॉ.एस.एन.साळुंखे यांनी रामानुजन यांच्या गणित विषयासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली.रामानुजन यांनी गणित विषयाच्या मांडलेल्या प्रमेयावर आज देखील संशोधन सुरू असल्याचे नमुद केले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याची माहिती देतांना भारतीय गणितज्ञ रामानुजन यांचे गणित विषयातील योगदान हे बहुमूल्य असून त्यांना गणित विषयातील कोणतेही उदाहरण,कोडे हे विचारले तर ते लगेच सोडवून दाखवत . परंतु दुर्दैवाने रामानुजन यांचा कमी वयात मृत्यू झाला.कोणत्याही थोर व्यक्तींची थोरवी हे त्यांच्या कार्यावर अवलंबून असते.रामानुजन हे भारतीय गणितज्ञ असले तरी जगात त्यांच्या कार्याची ओळख अजरामर असल्याचे सांगितले.सदर प्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनींना उपस्थित होते.