<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील सुनील वाणी, भूषण दिलीप लाडवंजारी , पीतांबर भावसार व शिरीष तायडे यांच्या सह देशातील 40 व्यक्तीची दिल्ली येथे बैठक सांपंन झाली.
20 व 21 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे महिला व बालकल्याण मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत महाराष्ट्रातून मला दिल्ली येथे जाण्याचा योग आला होते 20 डिसेंबरला दिल्ली येथील राष्ट्रपती भवन व पंतप्रधान संग्रहालय येथे भेट दिली. व दुसऱ्या दिवशी महिला व बालविकास मंत्री ना.स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण देशातील एनजीओंची बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी बरीचशी चर्चा महिला व बालकांच्या विकासासंदर्भात झाली.
माननीय नामदार स्मृती इराणी यांनी सर्व एनजीओ सदस्यांचे समस्या ऐकून घेतल्या व त्यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तुळजाई फाऊंडेशन भूषण यांनी महिलांच्या विषयावर कामाची मांडणी करून इतर नियोजन दिले .
या वेळी जळगाव चे सुनील वाणी यांनी काही मुद्दे मांडून खरोखरच आम्ही केंद्र शासनाचे व महिला व बाल विकास मंत्रालयाचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिली. गेल्या 35 वर्षापासून मी या क्षेत्रात असून प्रथमच अशा पद्धतीने आमचा मान सन्मान करून आम्हास दिल्ली येथे बैठकीसाठी विमान प्रवासाचे दोघीकडचे विमान तिकीट आमच्या मेलवर पाठवले व नवी दिल्ली येथील पोचल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्रालयातील अधिकार्यांनी /कर्मचाऱ्यांनी आमची खूप चांगली अशी व्यवस्था या ठिकाणी केली खरोखरच आम्ही पुन्हा एकदा या सर्व अधिकारी कर्मचारी माननीय नामदार स्मृति ईराणी यांचे आभार मानतो असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
पीतांबर भावसार व शिरिष तायडे यांनी देखील कामाचा अनुभव कथन केले.