Sunday, May 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडेला उपविजेतेपद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडेला उपविजेतेपद

जळगाव दि. 28 प्रतिनिधी – विशाखापट्टणम येथे दि.१० ते १३ डिसेंबर दरम्यान नुकताच संपन्न झालेल्या २८व्या राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चा खेळाडू योगेश धोंगडेने नामवंत खेळाडूंचा पराभव करून उपविजेतेपद प्राप्त केले. त्यात प्रामुख्याने सध्याचा विश्वविजेता खेळाडू संदीप दिवे याचा उपांत्यफेरीत तसेच सध्याचा विश्वउपविजेता खेळाडू आयकर विभागाचा अब्दुल रहेमान याचा चौथ्या फेरीत पराभव केला. तत्पूर्वी दुसऱ्याफेरीत सिव्हिल सर्विसेसच्या एम.अशोककुमारचा, तिसऱ्याफेरीत पेट्रोलियमच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू के. रामेश्बाबुचा आणि उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या विकास धारियाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र तो उत्तरप्रदेशच्या मोहम्मद आरिफ विरुद्ध पराभूत झाला. योगेश धोंगडे यास रोख रुपये १५,०००/- आणि चषक पारितोषिक तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीकरिता महत्वपूर्ण सात गुण प्राप्त झाले. त्याच्या या यशस्वी कामगिरी करिता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, मुख्य प्रशासकीय क्रीडाधिकारी अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसिन आदींनी अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ.जे.जी.पंडित विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी यात्रेचा परिसर केला चकाचक

Next Post

झांबरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आणि वसंत बहार सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरे

Next Post
झांबरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आणि  वसंत बहार सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरे

झांबरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आणि वसंत बहार सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo