<
खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आणि वसंत बहार सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय सल्लागार आणि सांस्कृतिक समन्वयक श्री शशिकांत वडोदकर हे अध्यक्षस्थानी होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद योजना विभागाचे शिक्षणाधिकारी श्री एस जी परदेशी, सिनेट सदस्य श्री विष्णू भाऊ भंगाळे, विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका वैजयंती तळेले,प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ धनश्री फालक, कीलबिल बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना नेमाडे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे संगीत शिक्षक रितेश भोई यांनी बसवलेल्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली.सरस्वती पूजन आणि दिपप्रज्वलन करून मान्यवरांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
याप्रसंगी मार्च २०२३ च्या एस.एस.सी.शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना,तसेच विषयवार प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. शाळेचे आदर्श विद्यार्थी म्हणून अथर्व ब्रह्म क्षत्रिय आणि प्रणाली नारखेडे या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्यभिषेकाचे औचित्य साधून शाळेचे परिमल ह्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिवकालीन कील्ले आणि शस्त्रे या प्रदर्शनाचे उद्घाटन के.सी.ई. सोसायटीचे कोषाध्यक्ष श्री डी.टी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांनी युक्त असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ प्रतिभा लोहार यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ पूनम कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग राणे आणि सी.बी.कोळी यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.