<
जळगाव – प्रतिनिधी-राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्राम पंचायत विकास आराखडा लोकसहभागाने तयार करावा व काळजीपूर्वक नियोजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल दादा पाटील यांनी केले.
भूषण लाडवंजारी व सुनील अहिरराव यांनी प्रशिक्षक म्हणून या सर्वांना प्रशिक्षण दिले.
शाश्वत विकास ध्येय अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील एकूण 119 गावांचे सरपंच व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचे इंदिरा गांधी भवन येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री अनिल दादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करीत असताना ना. अनिल दादा पाटील यांनी सागितले कि गावाचा विकास करीत असताना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला करून द्यावा. आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना योजनाचा जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल व ग्रामीण भागात आरोग्याबाबत काही योजनाचा गाव विकास आराखडा तयार करत असताना आपण काही योजना समाविष्ट करू शकतो का याचा देखील आपण विचार करावा असे मत व्यक्त केले. या प्रसंगी गट विकास अधिकारी श्री सुशांत पाटील साहेब यांनी 15 वा वित्तयोगाचा आराखड्यात शासनाच्या लाईन डिपार्टमेंटचे सहकार्य घेऊन सर्वसमावेशक असा आराखडा ग्रामपंचायतचा झाला पाहिजे असे प्रास्ताविक करतांना सांगितले.
या कार्यक्रमात प्रशिक्षक श्री.अहिरराव तसेच प्रशिक्षक श्री.भूषण लाडवंजारी यांनी सन २०२४-२५ या वर्षाचे आराखडे तयार करण्यासाठी शाश्वत विकास ध्येयामधून समतोल विकास कसा साधला जाईल, आपला आराखडा सर्वसमावेशक कसा होईल याबाबत मागदर्शन केले.
या प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन एस एम कठाले विस्तार अधिकारी यांनी केले तर आभार श्री.एल. डी. चिंचोरे, विस्तार अधिकारी यांनी केले.