<
जळगाव – (प्रतिनिधी) – आज रोजी वनक्षेत्र जळगांव अंतर्गत नशिराबाद ता.जि. जळगांव येथे मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन वन्यप्राणी कासव-३ नग (Indian SoftShell Turtle -१) (Indian Flapshell Turtle- २) ची तस्करी करुन विक्री करताना ३ आरोपीना वनविभाग जळगांव यांचे मार्फत विक्रीच्या उद्देशाने वाहतुक करताना मुद्देमालासह पकडण्यात आले. Wildlife Crime Cantrol Beuro New Delhi यांचेकडुन प्राप्त माहीतीनुसार सदर वन्यप्राणी कासव हे अज्ञात इसमाकडुन विक्री करण्यात येणार असलेबाबत माहीती उपसंचालक WCCB New Delhi यांचेकडुन उपवनसंरक्षक जळगांव यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने काही दिवसापासुन सदर व्यक्तीवर पाळत ठेवण्यात आली होती. त्याअनुषंगाने आज दि.०७.०२.२०२४ रोजी ३ आरोपी नामे १) संजय श्रावण कोळी २) भुषण संयज कोळी २) अकबर अली मेहमुद अली सर्व रा. नशिराबाद यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनगुन्हात पकडण्यात आलेले तीन कासव हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या सुची-१ मध्ये येत असुन सदर कृत्य हे दंडनिय अपराध आहे.
सदर कार्यवाही ही मा.योगेश वरकड, उपसंचालक Wildlife Crome Cantrol Beuro New Delhi, मा.प्रविण ए. उपवनसंरक्षक, जळगांव व सहाय्यक वनसंरक्षक यु. एम. बिराजदार सो याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कार्यवाही श्री. सचिन जाधव वनपरिक्षेत्र वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. नितीन बोरकर, वनपाल श्री. योगेश दिक्षीत, वनपाल श्री. संदीप पाटील, वनरक्षक श्री. भागवत तेली, श्री. अजय रायसिंग, श्री.हरीष थोरात, श्री. दिपक पाटील, श्री. गुलाबसिंग ठाकरे वाहन चालक श्री. भगवान चिम यांनी केली. सदर कार्यवाहीत श्री. विवेक देसाई, मानद वन्यजीव रक्षक जळगांव व उमेश पाटील, अध्यक्ष Biologist ideol organization, जळगांव यांच्या उपस्थित पार पाडली.
सदर गुन्हयातील पुढील चौकशी श्री. यु. एम. बिराजदार सहाय्यक वनसंरक्षक, जळगांव व श्री.नि.अ.बोरकर वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगांव (प्रा.) करित आहे.