जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय पहूर येथे बिनटाका कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया कॅम्प चे आयोजन करण्यात आले.
सदर कॅम्पमध्ये एकूण महिलांवर बिनटका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली.
नाशिक येथील प्रसिध्द लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉ.वर्षा लहाडे बिनटक्याच्या कुटुंब नियोजन यांनी शस्त्रक्रिया केल्यात. डॉ.जयश्री पाटील,डॉ.संदीप कुमावत यांनी सहाय्य केले.
आरोग्य विभाग व ग्रामीण रुग्णालय पहूर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
कॅम्प यशस्वीतेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत,डॉ.नरेश पाटील,डॉ.कल्याणी राजपूत,डॉ.सागर पाटील-सोनाळकर,डॉ.सुवर्णा पांढरे,डॉ.कुणाल बाविस्कर,
डॉ.भाग्यश्री बावस्कर डॉ.किरण पाटील,डॉ.जितेंद्र वानखेडे यांनी अनमोल सहकार्य केले.
खाजगीत पस्तीस ते चाळीस हजार खर्च लागणाऱ्या बिनटक्याच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्प चे आयोजन केल्याबद्दल ग्रामीण भागातील जनतेकडून समाधान व्यक्त करण्यात आले व यापुढेही अशा प्रकारच्या कॅम्प चे आयोजन करण्याची मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे व वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा यांच्याकडे परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली.