लोहारा ता.पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी नव्याने पदभार स्वीकारला आहे ते याआधी नाशिक ग्रामीण येथे कार्यरत होते. माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे साहेबांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील माणुसकी समूहाचे कार्य साहेबांनी आवर्जून जाणून घेतले व विशेष करून पिंपळगाव हरेश्वर हद्दीतील माणुसकी ग्रुपची माहिती घेतली. निस्वार्थी सेवेचे कार्य माणुसकी समूहाचे आहे ते खरच कोणी करत नाही तुमच्या या जनसेवेच्या कार्यात आम्ही सदैव तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहू अशा शब्दात साहेबांनी कौतुक केले. व तुमच्या पोलीस स्टेशन हद्दीत कुठेही बेवारस म्हणून पेशंट असल्यास आम्हाला कळवा आमची माणुसकी समूहाची टीम उपस्थित राहील असे गजानन क्षीरसागर यांनी सांगितले.यावेळी माणुसकी समूहाचे गजानन क्षीरसागर, नंदा पाटील,पोलीस कॉन्स्टेबल रणजीत राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत उपस्थित होते.