<
लोहारा ता पाचोरा जि जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे कौशल्या वर आधारित शिक्षणाचे महत्त्व याविषयीचे मार्गदर्शन सौ दिपाली योगेश चौधरी यांनी केले.
सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून माहिती दिली त्यानंतर सौ दिपाली चौधरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दहावी बारावीनंतर कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय कोर्स उपलब्ध असतात विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा एमपीएससी यूपीएससी परीक्षेमध्ये कोणकोणते पद असतात याविषयीचे मार्गदर्शन केले निश्चितच विद्यार्थ्यांना भविष्यात त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी संपादन केला या विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय व्ही चौधरी सर यांनी केले व आभार मानले या कार्यक्रमासाठी इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.