<
लोहारा ता पाचोरा जि जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
धीशेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ.जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्या वतीने नवीन स्थानिक सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सहसचिव आदरणीय यु यु पाटील सर होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले सर यांनी केले स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून कृषी भूषण विश्वासराव आनंदराव पाटील तसेच उपाध्यक्ष म्हणून अ अ पटेल सर यांची निवड करण्यात आली तर स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून डिगंबर नथू चौधरी ,शिवराम रामचंद्र भडके ,उत्तमराव वेडूजी शेळके डॉ. देवेंद्र भीमराव शेळके सुरेश गरबड चौधरी, गोविंदराव दौलतराव देशमुख दत्तात्रय भिका माळी विजय श्रीकृष्ण पालीवाल सुनील भाऊ क्षीरसागर उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने व शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्या वतीने रुमाल टोपी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नवीन स्थानिक सल्लागार समितीच्या वतीने विद्यालयाला जाळीची कंपाउंड वॉल करण्यात येत आहे त्याचे सुद्धा भूमिपूजन संस्थेचे सहसचिव यु यु पाटील सर व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषी भूषण विश्वासराव आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष यांनी विद्यालयाला अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरास पत्र हे सप्रेम भेट दिले त्याचे वाचन विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक वाय पी वानखेडे यांनी केले व त्याविषयी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली संस्थेचे सहसचिव यु यु पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या शैक्षणिक कार्याविषयीची माहिती दिली स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषी भूषण विश्वासराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून सत्यनिष्ठा प्रामाणिक कार्यास महत्त्व दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या शैक्षणिक वाटचाली विषयी मार्गदर्शन केले विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले सर उपमुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम पयवेक्षक व्ही एम शिरपुरे सर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले व आभार मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते