<
जळगाव – (प्रतिनिधी) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगांव यांच्या विद्यमाने आयोजित जळगांव जिल्हा मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहांचे उडान २०२४ जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री.योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.18 फेब्रुवारी २०२४ रोजी बियाणी मिलीटरी स्कूल, भुसावळ याठिकाणी संपन्न झाले.
जिल्हास्तरीय कला व क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन बियाणी मिलीटरी स्कूल चे संचालक श्री. मनोज बियाणी, सचिव श्रीमती. डॉ.संगीता बियाणी, सहायक आयुक्त, समाज कल्याण, श्री. योगेश पाटील, प्राचार्य श्री.डी.एम पाटील, श्री. राजेश कांबळे, कार्यालय अधिक्षक, समाज कल्याण, यांच्या प्रमुख उपस्थित हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. सदर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत गोळा फेक, लांब उडी, 100 मी. 200मी. ४०० मी. धावणे इ. प्रकारचे खेळ आयोजित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. तसेच समूह नृत्य, गायन, मीमीकरी, इ. कला प्रकार एकूण १२ वसतिगृहातील ७१० मागासवर्गीय मुला-मुलींनी सहभाग घेतला. सदर कला व क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांना परीक्षकांच्या माध्यमातून गुणांकन करण्यात आले असून यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बियाणी मिलीटरी स्कुल च्या सचिव श्रीमती.डॉ. संगीता बियाणी, सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री. योगेश पाटील, कार्यालय अधिक्षक श्री. राजेंद्र कांबळे, निरीक्षक श्री. आर. सी. पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. यावेळी सदर जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बियाणी मिलिटरी स्कुल, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.