<
जळगाव – (प्रतिनिधी) – शहरातील जी. एस. ग्राऊंड येथे बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व-२ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून टॉस का बॉस स्पॉन्सर इंजी. डिगेश तायडे, बॅटिंग ऐंड स्पॉन्सर मोरेज फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सतिश मोरे, बॉलिंग ऐंड चे स्पॉन्सर आशिष इलेक्ट्रिक्स् चे संचालक संजय इंगळे, टिम संघमालक ॲड. मधुकर सपकाळे, योगेश नन्नवरे, सचिन सपकाळे, अनुप मनोरे, दिपराज बागुल, सुरेश सोनवणे, प्रसाद तायडे, विजय निकम, नितेश कापडणे, ललीत बागुल,सौ.भारती म्हस्के(रंधे), दिपक जाधव, मनसे उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे, अशुतोष मेढे, विजय सोनवणे, शिरिष तायडे, सतीशभाऊ गायकवाड, विशालभाऊ अहिरे, राधेभाऊ शिरसाठ, गणेशभाऊ पगारे उपस्थित होते.
स्पर्धेच्या सुरवातीला बौद्ध धम्मगुरु भन्ते सुगतवंस महाथेरो यांनी त्रिशरण पंचशील घेत स्पर्धकांना आशिर्वाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले तर प्रास्ताविक विक्रम रंधे यांनी केले तसेच योगेश नन्नवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी एकुण १६ संघ खेळासाठी आहेत व या क्रिकेट लिग चे आयोजन दिनांक २७ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत दिवस व रात्र अशा सत्रात आयोजन करण्यात आले आहे प्रेक्षकांनी या सामन्यांचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजन कमिटी कडुन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य प्रायोजक म्हणून प्रसिद्ध विधितज्ञ ॲड. राजेशजी झाल्टे यांनी सहकार्य केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विक्रम रंधे, पवनकुमार मेढे, दिनेश अहिरे, ॲड. दिपक सपकाळे, आशिष सपकाळे, यश सोनवणे,शुभम अहिरे, दशरथ सपकाळे, श्रावण बाविस्कर, नितीन सपकाळे, नितीन अहिरे यांनी परिश्रम घेतले.