<
जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन मासू ही एक अराजकीय विद्यार्थी संघटना असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थी हितासाठी कार्य करणारी महाराष्ट्रातील संघटना असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा प्रथम उद्देश आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यातून विद्यार्थिनींना आपले विचार हे प्रकट करण्याचे एक प्रकारे व्यासपीठ आम्ही मासूच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. सदर स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थिनींना सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रथम विद्यार्थिनीला २१००/- द्वितीय ११००/- व तृतीय ५०१/- असे पारितोषिक दिले जाईल स्पर्धेत भाग घेणारे गट ११ वी व १२वी च्या विद्यार्थिनींचा एक गट व पदवीचे शिक्षण घेणाऱ्या (ग्रॅज्युएशन) मुलींचा एक गट असा असेल. निबंध लेखनाचे विषय पुढील प्रमाणे आहेत-१)राजमाता जिजाऊ होत्या म्हणून…
२)माझ्या सावित्रीमाई होत्या म्हणून…
३) स्त्रियांना ५०% आरक्षण मिळालं पण १००% संरक्षणाचे काय?
सदर निबंध हा ७५० ते १००० शब्दांच्या मर्यादेत असावा.
आम्हाला आपला निबंध हा पोस्टाने दिनांक २१ मार्च पर्यंत पाठवायचा आहे. निबंध पाठवतांना त्यासोबत महाविद्यालयाचे ओळखपत्र झेरॉक्स जोडणे अनिवार्य आहे. निबंध पाठवण्याचा पत्ता- २४३/४अ/ब१ वृंदावन अपार्टमेंट, हरेश्वर नगर, रिंग रोड महेश प्रगतीच्या मागे सदर स्पर्धेच्या अधिक माहिती साठी मासूच्या कार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क क्रमांक – ७३८५०३२४०२.
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे राज्य उपाध्यक्ष ॲड. दिपक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महिला जिल्हाध्यक्ष रोशनी रोहीमारे, महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे यांच्याकडून तमाम विद्यार्थिनींना आवाहन करण्यात येते की आपण सदर निबंध स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा.