<
जळगाव दि. १४ मार्च : महिला कुटुंबात विविध जबाबदाऱ्यांसह कामांच्या ठिकाणी विविध भूमिका यशस्वीपणे सांभाळतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपल्या कर्तुत्वाचा यशस्वी ठसा उमटवीत आहे. मिळालेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संधीचे सोने करत असून गावातील नेतृत्ववान, कर्तृत्ववान अशा महिलांचा गौरव होणे म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळणे असे आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे कार्य ग्रामपंचायतीने केले असून महिला सबलीकरणासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षिका, अंगणवाडी सेविका,आरोग्यसेविका,आशासेविका,सर्व महिला बचतगट अध्यक्ष, नारी शक्ती सन्मान ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आल्याबद्दल कौतुक करण्यात आले. राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून महिला सक्षमीकरणास सर्वोच्च प्राधान्य आहे. बांभोरी गावाच्या विकासाठी पुढेही निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
बांभोरी प्रा.चा.येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन तसेच जागतिक महिला दिनानिमित्त नवनियुक्तवेगवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा आणि महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ५० पेक्षा जास्त महिलांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपशिक्षक रविंद्र सोनवणे यांनी केले. आभार सरपंच सचिन बिऱ्हाडे यांनी मानले. यावेळी उपसरपंच तुळसाबाई नन्नवरे, तालुका प्रमुख डी.ओ.पाटील, माजी सभापती रवींद्र नन्नवरे, मुकुंद नन्नवरे, सचिन पवार, ग्रामसेवक आर.एस.देवरे, ग्रा.पं. सदस्य आशाबाई नन्नवरे, शोभाताई साळुंखे, मंजुळाबाई नन्नवरे, रेखाबाई कोळी,अनिता नन्नवरे, भिकन नन्नवरे, जगदीश नन्नवरे, हिरामण नन्नवरे, महेंद्र नन्नवरे, संदीप सपकाळे,तसेच माजी सरपंच, गोपाल नन्नवरे,ईश्वर नन्नवरे, शांताराम नन्नवरे,अनिल नन्नवरे, धरणगाव तालुक्यातील सर्व सरपंच यांच्यासह महिला व मोठ्या संख्येने उपस्थित होते. बचत गट, अंगणवाडी सेविका, शिक्षक ,युवक-युवती ग्रामस्थ व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन
जिल्हा नियोजन अंतर्गत अंगणवाडी बांधकाम – ११ लक्ष, पेव्हर ब्लॉक बसवणे – ११ लक्ष, अंगणवाडी व शाळा रंगकाम – ६ लक्ष, दोन ई-घंटागाडी -६ , लक्ष ,जावई नगर मध्ये भुमिगत गटार बांधकाम – ८ लक्ष , समाज मंदिर बांधकाम – ७ लक्ष, बौध्द विहार बांधकाम – २५ लक्ष, नविन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम – २० लक्ष, नविन तलाठी कार्यालय बांधकाम – २० लक्ष , सोलर पथदिवे – २० लक्ष, भुमिगट गटारबांधकाम – १० लक्ष, रमाई, शबरी व मोदी आवास योजने अंतर्गत ७५ घरकुल धारकांना मंजुरीचे पत्र वाटप – १ कोटी १२ लक्ष अश्या विविध सर्वसामावेशक विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.