<
जामनेर – (प्रतिनिधी) – सार्वजनिक आरोग्य विभाग तालुका जामनेर वैद्यकीय अधिकारी कार्यालय जामनेर यांच्यावतीने ग्रामीण भागात तळागाळात कामकाज करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांचा सन्मान करण्याचा उद्देशाने “आशा दिनाचे”आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे,वरिष्ठ पत्रकार मोहन सारस्वत,आय. एम. ए चे डॉ. संदीप पाटील,डॉ प्रशांत महाजन,निमासंघटनेचे डॉ. नंदलाल पाटील,डॉ रवींद्र कासट,होमीओपॅथी असोसिएशन चे डॉ.मनोज विसपुते, डॉ योगेश सरसाळे,जामनेर डॉक्टर असोसिएशन चे डॉ. चंद्रशेखर पाटील,डॉ.अजय पाटील,डॉ राहुल माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ग्रामीण भागात काम करणाऱ्या गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा व विरंगुळा व्हावा या उद्देशाने त्यांच्या साठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला, व विविध स्पर्धांचे आयोजन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय जामनेर यांच्याकडून करण्यात आले. दैंनदिन कामकाजाचा ताण टाळण्याच्या उद्दिष्टाने व गटप्रवर्तक आशा यांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने आशा व गटप्रवर्तक यांच्यासाठी वारंवार अशा कार्यक्रमाचे आयोजन व्हावे व आज झालेल्या कार्यक्रमाबद्दल सर्व आशा स्वयंसेविका यांनी समाधान व्यक्त केले .
गटपवर्तक व अशा स्वयंसेविका या ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा आहेत त्यांच्यामुळेच आरोग्य यंत्रणेला कामकाज करणे सुलभ झाले आहे.आशा स्वयंसेविका यांनी भ्रूणहत्या बाबत जागृत राहून मुलगी “वाचवा देश वाचवा’ या मोहिमेत सक्रियपणे कामकाज करावे कोणी कोणतीही अडचण आल्यास मी भक्कमपणे आपल्या पाठीशी आहे. असे मनोगतात जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी यांनी प्रस्तावित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत यांनी मानले .
गतप्रवर्तक सविता कुमावत,सुनायना चव्हाण,माया बोरसे, रेखा तायडे ,सुनीता पाटील,अर्चना टोके,माधुरी पाटील, यमुना पाटील ,डॉ.नरेश पाटील,डॉ.संदीप कुमावत,डॉ. दानिश खान,डॉ मनोज पाटील,डॉ.किरण पाटील, डॉ. कल्याणी राजपूत यांचे अनमोल सहकार्य लाभले.