<
जळगाव – (प्रतिनिधी) – गेल्या दोन वर्षापासून रंगपंचमी साजरी करायला मिळाली नसल्याने यावर्षी मुक्त वातावरणात जळगांवकरांनी रंगपंचमी जोरदार उत्साहात साजरी केली.
शहरात अनेक ठिकाणी रंगपंचमी निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. होळीच्या कार्यक्रमात तर हजारो तरुण तरुणी उत्साहाने सहभागी झाल्याचे शहरात दिसुन येत होते. डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकत असल्याचे दृश्य शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.
परंतु याला अपवाद म्हणजे जळगाव शहरातील एक असा तरुणांचा मित्र समुह ज्यांनी अशा कुठल्याही डॉल्बीच्या ठेक्यावर ठेका न धरता…. मातोश्री वृद्धाश्रम व आश्रय माझे घर येथिल रहिवाशांची आस धरत या ठिकाणी एकदम उत्साहात रंगपंचमी साजरी केली, वृद्धाश्रमातील आजी – आजोबा सोबत रंगाची उधळण करीत आशिर्वाद घेतला, तसेच आश्रय माझे घर येथील मतीमंद निवासी विद्यार्थ्यांसोबत या तरुण मंडळीने रंगपंचमी साजरी केली, येथील मुलांनी देखील उत्साहीपणे प्रतिसाद देत रंगाची उधळण केली याठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यासाठी शिरीषकुमार तायडे, किरण लाडवंजारी, भुषण लाडवंजारी, ॲड. दिपक सपकाळे, पितांबर भावसार, राजु सोनवणे, विशाल जगदाळे, संदिप तांदळे, गोविंदा शुक्ला, संतोष कापडणे, योगेश सपकाळे, विनायक सोनवणे, हेमंत मांडोळे, निलेश सोनवणे, ज्ञानेश्वर पाटिल, कल्पेश बेलदार, सागर पाटील, महेंद्र पाटील, अशोक मोपारी, हर्षल पाटील, सचिन माळी, अमित तिवारी, दिपक गोळवे, रोहन महाजन, प्रथमेश मराठे आदी उपस्थित होते.