<
लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माणुसकी ग्रुप तर्फे शुभ मुहूर्तावर पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.यंदा पानपोईचे सातवे वर्ष आहे.यावेळी माणुसकी ग्रुप मार्गदर्शक ,ज्येष्ठ नागरिक तथा विकासो चे सभासद श्री प्रभाकर चौधरी (गुरुजी) व सैनिक प्रसाद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. गुरुवर्य प्रभाकर चौधरी यांनी सांगितले की पाण्याची खरी किंमत ही उन्हाळ्यात जाणवत असते परंतु माणुसकी समूहातील सर्व तरुण सामाजिक भान जपत जलसेवेचा उपक्रम दरवर्षीं उन्हाळ्यात न चुकता राबवतात हे कौतुकास्पद आहे विशेष करून माणुसकी ग्रुपचे गजानन क्षीरसागर हा अवलिया तरून समाजासाठी निस्वार्थपणे माणुसकी ग्रुप तर्फे विविध उपक्रम राबवून समाजाला आदर्श संदेश देण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो व गावातील सर्व तरुण ,ज्येष्ठ नागरिक माणुसकी ग्रुपच्या सामाजिक कार्यामध्ये सर्वजण भाग घेत असतात असे त्यांनी सांगितले.
सैनिक प्रसाद पवार यांनी सांगितले की आम्ही ड्युटीवर असताना देश सेवा करीत असतो परंतु घरी सुट्टीवर आल्यानंतर माणुसकी ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून चांगल्या मित्रांसमवेत वेळ देऊन समाजसेवा करण्याची संधी मिळते त्यातून मनाला समाधान मिळते असे त्यांनी सांगितले. आपण माणसांसाठी पानपोई चालू केली आहे परंतु उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी देखील आपल्या घराच्या छतावर पाणी आणि धान्य जरूर ठेवावे असे आवाहन यावेळी गजानन क्षीरसागर यांनी केले.लोहारा हे गाव बाजारपेठेचे असल्याने शेजारील खेड्यावरील नागरिक नेहमीच वस्तू खरेदी करण्यासाठी व सध्या लग्नसराई असल्यामुळे बस स्टँड परिसरात नेहमीच गर्दीचे स्वरूप असते परंतु बस स्टँड परिसरात कुठेही पाणी पिण्याचे नियोजन नसल्याने सर्वसामान्य माणसाला फक्त पाण्यासाठी काहीतरी विकत घ्यावे लागते तेव्हाच पाणी मिळते अशी परिस्थिती असल्याने सर्व सामान्य गरीब माणूस पाण्यासाठी वणवण फिरत असतो म्हणून दरवर्षी माणुसकी ग्रुप पाणपोईचे नियोजन करत असतो, बाहेर गावातील महिला,लहान मुले ,वृद्ध,नागरिक यांना पिण्यासाठी थंड पाणी मिळत असल्याने ते समाधान व्यक्त करीत आपले कामे आटपून घराकडे निघतात. या उपक्रमासाठी माणुसकी ग्रुप सर्व सदस्य मिळून पाणपोईची देखरेख करत असतात.
पानपोई सुरळीत चालू राहावी यासाठी माणुसकी समूहाचे श्री रामचंद्र भीवसने, सैनिक चंद्रकांत गीते, सैनिक नितीन क्षीरसागर, सैनिक संदीप बाविस्कर, सैनिक जगदीश तेली यांचे वेळोवेळी लक्ष असते.यावेळी रमेश लिंगायत,अमोल पाटील,गोकुळ माळी,सचिन पाटील,सुभाष गीते, प्रनेष क्षीरसागर,विशाल शेळके,फ्रेंड टेलर,भरत धनगर,सैनिक प्रदीप पवार, कुलवंत शेळके,संदीप कुंभार, मोहन चौधरी,अंकुश चौधरी, भया चौधरी,अजय भदाणे, विशाल पवार आदी माणुसकी ग्रुप सदस्य उपस्थित होते.सैनिक प्रसाद पवार यांच्या वतीने चहा वाटप करण्यात आली.गजानन क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार अमोल पाटील यांनी मानले.