Saturday, July 26, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्याच्या राजकारणात उन्मेशदादा पाटील यांचा हादरा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जळगाव लोकसभा मतदारसंघातील दिग्गजांचा प्रवेश...

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/04/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
जिल्ह्याच्या राजकारणात उन्मेशदादा पाटील यांचा हादरा

चाळीसगाव तालुक्यातील विधानसभा निवडणुकीतील वंचित आघाडीचे उमेदवार मोरसिंग राठोड यांचा कार्यकर्त्यांसह मुंबईत प्रवेश सोहळा
————————————–
चाळीसगाव – खासदार उन्मेशदादा पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार पदाचा राजीनामा देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत गटात प्रवेश केल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेत नवचैतन्य संचारले आहे. आज चाळीसगाव विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे मोरसिंग चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचे हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हा प्रवेश सोहळा मुंबई येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमूख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी जळगाव जिल्ह्याचे संपर्क मंत्री संजय सावंत यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे मान्यवर, मातब्बर, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उन्मेषदादा पाटील यांच्या प्रवेशाने शिवसेनेत नवचैतन्य
जळगाव लोकसभा मतदारसंघात संपर्कप्रमुख संजयजी सावंत यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेशदादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार पदाचा राजीनामा देत देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. एवढेच नव्हे तर स्वतः उमेदवारी न घेता आपले सहकारी मित्र तथा पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करणदादा पवार यांना उमेदवारी घेत त्यांनी राजकीय विश्लेषकांना तोंडात बोटे घालायला लावली होती.

आज पुन्हा एकदा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जोरदार लढत देणारे मुंबई येथील उद्योजक व लोंजे येथील भूमिपुत्र मोरसिंग राठोड यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. मोरसिंग राठोड यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत डोंगर घाटमाथा पट्ट्यातील बंजारा समाजाची लक्षवेधी मते घेत 38 700 मते घेतली होती व तिसऱ्या क्रमांकाची दमदार लढत दिली होती. आज उन्मेशदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या विजयाची घोडदौड सुरू झाली आहे.

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या नव्या नेतृत्वात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात जोरदार ‘इनकमींग’

आजच्या सोहळ्यात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील, भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर, जळगावच्या माजी नगरसेविका सरिता नेरकर, वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील नेते मोरसिंग राठोड यांच्यासह इतरांनी पक्षात प्रवेश घेतला.
आजच्या प्रवेश सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात पाचोरा-भडगाव मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी पक्षात दाखल झाले. यात शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिताताई पाटील यांच्यासह युवक राष्ट्रवादीचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष तथा लासुरे येथील रहिवासी अजय रंगराव देवरे; पंचायत समितीचे माजी सभापती तथा पिंपळगाव हरेश्‍वर येथील रहिवासी देविदास रामदास महाजन; लासुरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कपिल शिवाजी देवरे, लासुरे येथीलच सामाजिक कार्यकर्ते पंकज सुभाष देवरे, पाचोर्‍याचे माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ता शेख रसूल शेख उस्मान; पाचोरा येथील अल्पसंख्यांक कार्यकर्ता फिरोज पिंजारी; भडगाव येथील बशीर करीम शेख; कामरान बशीर शेख; इलियास अब्बास अली; शाहबाज इफ्तीखार सय्यद, अहमद शमीउद्दीन शेख; भडगाव येथील सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक बशीर शेख, भडगाव येथीलच राजू शेख; अभियंता मोहन परदेशी, वकील संघाचे सदस्य मोहसीन शेख; सामाजिक कार्यकर्ता साबीर शेख; शफीक टेलर, उषाताई परदेशी, गायत्रीताई पाटील, शब्बीर खान, शेख इब्राहिम, शेख अख्तर मुल्ला; शेख सलीम, अजमल खान, शेख खालीक; जुवार्डी येथील माजी सरपंच नाना रामदास पाटील, जुवार्डी विकासो चेअरमन प्रकाश रामराव पाटील, शिवाजी लक्ष्मण पाटील, आबा केशव पाटील व संजय शिवराम पाटील या मान्यवरांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे प्रमुख उध्दवसाहेब ठाकरे, संपर्क प्रमुख संजय सावंत, खासदार उन्मेशदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास – जीवन, इतिहास आणि कार्य

Next Post

जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

Next Post
जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications