<
जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ही एक अराजकीय विद्यार्थी संघटना असून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी काम करणारी महाराष्ट्रातली एकमेव विदयार्थी संघटना आहे.
जळगाव एस. टी महामंडळाच्या बसचा वापर मोठ्या प्रमाणावर खेडेगावातील गरीब कष्टकरी शेतकरी वर्ग व विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर करतो त्यांच्या प्रवासाचे एकमेव हक्काचे माध्यम म्हणजे बस आहे. अशातच विद्यापीठांमध्ये शिकत असणाऱ्या धारशीरी,वंजारे खपाट येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांची बस ही महामंडळामार्फत बंद करण्यात आली सध्या परीक्षेचे वातावरण असून अशातच विद्यार्थ्यांवर हे मोठे संकट हे महामंडळाकडून देण्यात आले आहे.
याविषयी विद्यार्थी आपले म्हणणे मांडण्यासाठी गेले असता आपल्या कर्मचाऱ्यांकडून असे सांगण्यात आले की बस बंद करण्याचा वरूनच जीआर आलेला आहे. तुम्हाला जे करायचे ते करा बस चालू होणार नाही विद्यार्थ्यांनी सांगितले की जर बस बंदच करायची होती तर आम्हाला आधी सांगितले असते आम्ही पास घेतली नसती आमचे पासचे पैसे हे वाया जातील महामंडळाच्या त्या कर्मचाऱ्याकडून असे सांगण्यात आले की तुमच्या त्या पास च्या पैशावर आमचे पेट्रोल सुद्धा निघत नाही त्याच्यामुळे ते पैसे पण भेटणार नाही व बस सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार नाही तुम्हाला जे करायचे ते करा.
अशे वर्तन करण्यात आले या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन मासू च्या जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांच्याशी संपर्क साधला असता तात्काळ तेथे पोचून महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे सुद्धा सोबत होते विद्यार्थ्यांचे व्यथा जाणून घेत राज्य उपाध्यक्ष ॲड. दिपक सपकाळे सर यांच्याशी संपर्क साधला सरांच्या मार्गदर्शन मध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या एस. टी. महामंडळाच्या प्रशासना समोर मांडल्या असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या बस आम्ही चालू करू विद्यार्थ्यांना बाबत आमची सकारात्मक भूमिका नेहमी असते असे महामंडळाकडून सांगण्यात आले आणि बेशिस्त वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा समज देण्यात येईल असे सुद्धा यावेळी आश्वासन देण्यात आले बस उपलब्ध न झाल्यास पुढील दोन दिवसात महामंडळामध्ये ठिय्या आंदोलन हे केले जाईल व याला जबाबदार आपले मंडळ राहील याची दक्षता घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे व अनेक विद्यार्थी हजर होते.