<
भडगाव – (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार दि. २९ रोजी भडगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलींना सर्वच गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावकऱ्यांकडून ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
भडगाव शहरासह तालुक्यातील वडजी, शिवनी, कोळगाव, पिंप्री हाट, जुवार्डी, आडळसे, गुढे आणि सावदे या गावांना करणदादा पाटील यांनी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी मतदान करणार तर ‘मशाल’लाच असा विश्वास करणदादा पाटील यांना दिला.
रॅलीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजयनाना वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस याकूब खान पठाण, तालुकाध्यक्ष रतीलाल पाटील, युवक तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील, शहराध्यक्ष कमरअली पटवे, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, राष्ट्रवादीचे पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश परदेशी, माजी नगरसेवक शंकर मारवाडी, योजना पाटील, प्रल्हाद पाटील, जितन शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शामकांत भोसले, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुरेश पाटील, शहराध्यक्ष शेरखां पठाण, वडजीचे माजी सरपंच राजेंद्र मोरे, उपसरपंच स्वदेश पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक पाटील, प्रल्हाद जगताप, युवासेनाचे उपतालुका प्रमुख चेतन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पाटील, शहर उपप्रमुख सुदर्शन माने, शहर संघटक मयूर ठाकरे, युवासेना अपलसंख्यांक आघाडीचे मुन्ना शेख, हेमंत विसपुते, माजी सभापती रामकृष्ण पाटील, पिंप्री हाटचे सरपंच दीपक मोरे, उपसरपंच शांताराम पाटील, समाधान पाटील, कल्याण पाटील, प्रवीण पाटील, रवींद्र पाटील, झिपरू केदार, ग्रा. पं. सदस्य विजय केदार, अनिल केदार, चंद्रकांत केदार, संजय केदार, नाना केदार, वाल्मीक केदार, समाधान पाटील, जुवार्डी विकासोचे माजी चेअरमन आबा पाटील, चेअरमन संजय पाटील, संचालक विजय पाटील, आडळसेचे सरपंच दिपू नाना, नरेंद्र पाटील, हर्षल पाटील, गुढे येथील तुकाराम महाजन, दिलीप पाटील, संजय पाटील, उत्तम पाटील, दीपक पाटील, उत्तम नाना महाजन, नितीन महाजन, गोरख माळी, गोपाल माळी, गंगाधर माळी, ज्ञानेश्वर माळी, हर्षल माळी, तुकाराम महाजन, हरिभाऊ पाटील, माजी सभापती विकास पाटील, सावदेचे सरपंच वाल्मीक पाटील, विनोद पाटील, धनंजय पाटील, नाना पाटील, दिलीप पाटील, दिलीप परदेशी, जगन पाटील, संभाजी पाटील यांसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.