<
जळगाव दि.10 प्रतिनिधी- “जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश या दृष्टीने आपल्या भारत देशाकडे सन्मानाने पाहिले जाते. भारतीय मतदात्याने नेहमीच आपली भूमिका चोख बजावलेली आहे. मतदान हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यही! मतदान करणे हा संविधानाचा सन्मान आहे.
मतदानाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी आपण योग्य लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकतात. देशभक्त आणि जागरुक नागरिक मतदान करतात व देशाच्या लोकशाहीला बलशाही करतात. आज जगामध्ये बऱ्याच घडामोडी होत आहेत. एक स्थिर सरकार भारतात निकडीचे आहे. भारत परत एकदा जगामध्ये अग्रेसर होण्याचा उंबरठ्यावर उभा आहे. गरज आहे भारत देशाला विकासीत आणि सुरक्षित करण्याची. सर्वांना एकत्र घेऊन उज्ज्वल भविष्याची वाटचाल करण्याची. देशभक्त आणि कर्तव्यदक्ष नेतृत्त्व म्हणजे आपला भारत देश सर्वदृष्ट्या सक्षम होणे. चला मतदान करुया!”
श्री. अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.