फैजपूर-(प्रतिनिधी) – तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूर येथे इ.१२वी चा निकाल ९८.०३% लागला असून दरवर्षी प्रमाणे निकालाची परंपरा महाविद्यालयाने कायम ठेवली. यामध्ये विज्ञान विभागाचा निकाल ९९.५०% लागला असून प्रथम क्रमांक फिरके फाल्गुनी युवराज व पाटील हेमांगी गणेश यांनी मिळविला दोघांना८८.३३% गुण मिळाले. तर द्वीतीय क्रमांक पाटील वसुधा संदीप ८७.८३% गुण व तृतीय क्रमांक वाघुळदे दीक्षा प्रमोद ८७.००% गुण. तसेच विज्ञान विभागात एकूण ८० टक्के पेक्षा जास्त असलेले ३४ विद्यार्थी आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल १००% लागला असून प्रथम क्रमांक कोमल राजेंद्र पाटील ८३.६७% गुण, द्वीतीय क्रमांक बालानी भूमिका अजय ८३.००% .गुण, तर तृतीय क्रमांक सरोदे योगिता युवराज ८२.००% गुण. कला शाखेचा निकाल ८०.००% लागला असून प्रथम क्रमांक वैद्य साईश्री विजय ७०.३३% गुण, द्वीतीय क्रमांक वाणी यश देविदास ६९.००% गुण तर तृतीय क्रमांक तायडे देवांग मनोहर ६८.८३% गुण प्राप्त केले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष सन्मा.आमदार शिरीष दादा चौधरी, उपाध्यक्ष-एस.के.चौधरी , मिलिद वाघूळदे, चेरमन-लिलाधर चौधरी, सचिव-एम.टी.फिरके, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे, उपप्राचार्य कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उत्पल चौधरी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थांचे अभिनंदन व कौतुक केले व शुभेच्छा दिल्या आहेत.
एच.एस.सी. फेब्रु / मार्च-२०२३-२४ परीक्षेतील
गुणवंत विद्यार्थ्यांची नावे व एकूण निकाल
१२ वी विज्ञान शाखा (एकूण निकाल ९९.५०%)
अ.क्र.
विद्यार्थ्याचे नाव
मिळालेले गुण
शेरा
१
फिरके फाल्गुनी युवराज
८८.८३%
प्रथम क्रमांक
२
पाटील हेमांगी गणेश
८८.८३%
प्रथम क्रमांक
३
पाटील वसुधा संदीप
८७.८३%
द्वीतीय क्रमांक
४
वाघुळदे दीक्षा प्रमोद
८७.००%
तृतीय क्रमांक
१२ वी वाणिज्य शाखा (एकूण निकाल १००%)
अ.क्र.
विद्यार्थ्याचे नाव
मिळालेले गुण
शेरा
१
पाटील कोमल राजेंद्र
८३.६७%
प्रथम क्रमांक
२
बालानी भूमिका अजय
८३.००%
द्वीतीय क्रमांक
३
सरोदे योगिता युवराज
८२.००%
तृतीय क्रमांक
१२ वी कला शाखा (एकूण निकाल ८०.००%)
अ.क्र.
विद्यार्थ्याचे नाव
मिळालेले गुण
शेरा
१
विद्या साईश्री विजय
७०.३३%
प्रथम क्रमांक
२
वाणी यश देविदास
६९.००%
द्वीतीय क्रमांक
३
तायडे देवांग मनोहर
६८.८३%
तृतीय क्रमांक. एकूण निकालाची टक्केवारी ९८.०३%