<
सावळदबारा – (प्रतिनिधी) – जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित शिवाजी विद्यालय सावळदबारा दहावीचा निकाल 98.71 टक्के लागून उज्वल यशाची परंपरा विद्यालयाने कायम ठेवली आहे परिसरातील अनेक विद्यार्थी व खास करून मुलींच्या शिक्षणाच्या सोयीसाठी स्थापन करण्यात आलेली ही संस्था त्या वर्ग दहावी निकालात उज्वल यशाची परंपरा कायम राखून नेहमीच कौतुकास्पद ठरतात व याचें सर्व श्रेय जाते ते मुख्याध्यापक एन आर कोलते सर व यांची सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर बंधू यांची मेहनत व विद्यार्थ्यांना ज्ञानदानाच्या कार्यातून त्यांचा भविष्याचा विचार करून ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे चालू असते संस्था संचलित सर्व विद्यालयांमध्ये प्रात्यक्षिकापासून ते सर्व सुविधा युक्त असे क्लास वर्क येथे घेतले जातात कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले शिक्षक व त्यांना उपलब्ध होणाऱ्या भौतिक सुविधा यांच्या जोरावर विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले जाते हो या सर्वांचा समन्वय साधूनच विद्यालयाचा निकाल हा मागील दहा वर्षापासून 90% च्या वरच लागतो यामध्ये खास करून मुलींचे प्रमाण हे 75 टक्के च्या वरती आहे आजचे हे बालक उद्याचे पालक आहे व यांच्या हातामध्ये देशाचे भवितव्य असल्यामुळे त्यांचा हा ज्ञानरूपी आरसा जगाच्या पाठीवरती कुटुंबाचे विद्यालयाचे नाव उज्वल करतो हे विशेष यामधूनच अनेक डॉक्टर शिक्षक इंजिनियर व फार्मासिस्ट, पोलीस आर्मी ऑफिसर तसेच उत्तम असे शेतकरी व उद्योगपती निर्माण होऊन देशी सेवेसाठी ते तत्पर असतात हे आमच्या संस्थेचे विशेष आहे अशी माहिती जीवन कोलते यांनी दिली याअनुक्रमे आपले क्रमांक मिळवले त्यांचे संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 मध्ये आमच्या जय कालिंका देवी शिक्षण प्रसारक संस्था सावळदबारा संचलित, शिवाजी विद्यालयाचा निकाल 98.71 टक्के लागला असून
प्रथम – दिव्या रावसाहेब सदाशिवे-93.80%
द्वितीय – समर्थ श्रीकृष्ण सोनुने-93.00%
तृतीय – मो.आलीया मो.रोशन-91.80%
चतुर्थ – चैतन्या समाधान चांदे-91
पाचवी – शेख नाझिया नाजीउल्ला 91.00%
पाचवी -काळे अदिती शालिकराम 91%
सहावी- कोळपे कोमल भागवत 90.00%
उत्तीर्ण झाले असून सर्व यशवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा संस्थाध्यक्ष भावराव लक्ष्मणराव कोलते व सर्व संचालक मंडळ यांनी दिला.यशवंत व्हा कीर्तीवंत व्हा….
वरील विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यालय मध्ये घवघवीत यश मिळवले तसेच उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा प्रथम श्रेणीमध्ये सुद्धा विद्यार्थी गुणवंत झाले त्यांचे सुद्धा विशेष अभिनंदन संस्थेमार्फत करण्यात आले त्यांच्या भविष्यात व पुढील वाटचालीस प्राचार्य एन आर कोलते सर यांनी शुभेच्छा दिल्या.पालकांनी व विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये कला शाखेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना क्लासवन अधिकारी करावे असे प्रतिपादन सुद्धा केले.
यावेळेस संस्था संचलित सर्व शिक्षक विकास पाटील, विजय सिंग राजपूत, भास्कर ससाने, मुकुंदा व्यवहारे, भूषण देसले, सुदाम राठोड, पोपटराव सोनवणे, ज्ञानेश्वर राठोड, श्रीकृष्ण सोनवणे, विनोद जाधव, संजय जोशी, भास्कर खमाट,अजबराव चव्हाण, श्याम जाधव, बाबासाहेब कोलते, राहुल बडक गजानन चव्हाण शिक्षकेतर कर्मचारी व पालक व विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस सर्व संस्थाचालक पदाधिकारी संचालक मंडळ गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार बंधू विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचा पुनश्च एकदा अभिनंदन करण्यात आले अशी माहिती प्रा.जीवन कोलते यांनी दिली