नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला देश आणि जगभरातून ८००० निमंत्रित उपस्थित आहेत. ७ वाजून १५ मिनिटांनी मोदींसह प्रमुख सहकाऱ्यांचाही शपथविधी संपन्न होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमन यांनीही आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.