फैजपुर-(प्रतिनिधी) – धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर येथे बी.ए, बी.कॉम, बी.एससी. वर्गातील सर्व विद्याशाखांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना महविद्यालय निवडीबाबत खूपच काळजीपूर्वक विचार करावा लागणार आहे. आपला पाल्य ज्या महाविद्यालयात प्रवेश घेत आहे त्या महाविद्यालयात कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखा पूर्वीपासून अस्तित्वात असणे अत्यंत गरजेचे आहे.
कारण नवीन शैक्षणिक धोरण-2020 नुसार कोणत्याही शाखेत प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना इतर दोन शाखांचे विषय ओपन इलेक्टिव्ह म्हणून घेणे आवश्यक आहे, त्याच बरोबर हिंदी,मराठी,इंग्रजी,भाषा, भारतीय ज्ञान पद्घती, सह-पाठ्यक्रम आधारित असे मुख्य, वैकल्पिक व इतर सक्तीचे विषय अशी विभागणी असल्याने विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झीट साठी विषयानुसार व शाखानिहाय योग्य पर्याय निवडीचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. या बाबी लक्षात घेता धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर हे परिसरातील एकमेव महविद्यालय आहे जिथे तिन्ही शाखा पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. तसेच प्रवेशाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांची तारांबळ होऊ नये किंवा त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर चे प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांनी तशा प्रकारचा शैक्षणिक आराखडा तयार करून घेतला आहे व सर्व शाखांतील तज्ञ प्राध्यापकानी मिळून एन.ई.पी.2020 नुसार प्रवेशासाठी सर्व विषय उपलब्ध होतील याची काळजी घेतली आहे. म्हणून रावेर,यावल,भुसावळ, तसेच इतर तालुक्यातून सुध्दा धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर हे विद्यार्थ्यांच्या पसंतीचे महाविद्यालय ठरले आहे.
धनाजी नाना महाविद्यालयाला राष्ट्रिय पातळीवरील अतिशय दर्जेदार समजल्या जाणाऱ्या नॅक मूल्यांकनात ‘ए’ श्रेणी प्राप्त आहे.महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक व शारीरिक विकासासाठी असंख्य सुविधा आहेत. महाविद्यालयातील खेळ विभागात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवून अनेक पदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची परंपरा आहे. महाविद्यालयात भव्य इनडोअर, आऊटडोअर स्टेडियम आहे. विविध खेळांसाठी भव्य पटांगण आहे. विविध कला गुणांना वाव मिळावा यासाठी दामोदर नाना चौधरी क्षमता व कौशल्य विकास केंद्र आहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे, जुन्या व नवीन पुस्तकांनी सज्ज असे भव्य वाचनालय आहे. ऑनलाईन पुस्तक देवाण-घेवाण साठी व लाखों दुर्मिळ पुस्तकांनी सज्ज असे भव्य ग्रंथालय आहे. त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने डिजिटल ग्रंथालय निर्माण केले आहे. सर्व शाखांमधील तज्ञ व उच्च शिक्षित प्राध्यापक वृंद आहे.
पूर्वोत्तर खानदेशात धनाजी नाना महाविद्यालय हे एकमेव असे महविद्यालय आहे जेथे महाविद्यालयीन स्तरावर एन.सी.सी. ची सर्वात मोठी तुकडी आहे ज्याचा फायदा घेऊन विद्यार्थी आपले सैन्य दलात अधिकारी म्हणून भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. सामाजिक उपक्रमातून सुज्ञ नागरिक घडावा यासाठी एन.एस.एस. सारख्या उपक्रमांतून विद्यार्थी घडविले जातात. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या वतीने स्कॉलरशिप मिळत नसेल अश्या विद्यार्थ्यांसाठी ही अनेक प्रकारे अर्थसहाय्य योजना राबविण्यात येते. तसेच बाहेरील संस्थांकडून शैक्षणिक स्कॉलरशिप ची व्यवस्था केली जाते. विद्यार्थि विकास विभाग अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांनीमध्ये ही उद्योजकता विकास, स्वयंसिद्ध, कराटे, ज्युडो,योगा, प्राणायाम, निरोगी आयुष्यासाठी त्या-त्या विषयातील तज्ञ व्यक्तीं मार्फत मार्गदर्शन दिले जाते. संशोधन केंद्र, संशोधन प्रकल्प सादरीकरण कार्यशाळा, सर्व रसायन आणि तंत्रज्ञानाने युक्त अशी भव्य प्रयोगशाळा, संगणक लॅब, बॉटनिकल गार्डन, माती परीक्षण केंद्र, पीपीटी प्रेझेंटेशनसाठी वातानुकूलित डिजिटल क्लासरूम, भव्य सेमिनार हॉल, विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम,आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जवळच असलेले वसतिगृह, विद्यार्थिनीसाठी सर्व सुविधांनी युक्त सुरक्षित असे वसतिगृह. विद्यार्थ्यांना वाजवी दरात शैक्षणीक साहित्य मिळावे यासाठी उभारलेले ग्राहक भांडार. व पिण्यासाठी आरोग्यदायी शुद्ध आरओ चे पाणी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्या,गैर प्रकारास आळा बसावा,विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून पूर्ण परिसरात काना कोपऱ्यात बसविण्यात आलेले सीसीटिव्ही कॅमेरे, निसर्गरम्य विशाल परिसर अश्या अनेक सुविधांमुळे विद्यापीठ स्तरावर दरवर्षी किमान पाच-सहा गोल्ड,रजत व कांस्य पदक प्राप्त विद्यार्थी हे अगदी हमखास या महाविद्यालयाचे असतातच. म्हणून परिसरातील व जिल्हाभरातील पालकांनी व सुज्ञ अभ्यासू विद्यार्थ्यांनी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरला प्राधान्य दिले आहे.
सद्या प्रवेश प्रक्रिया वेगात सुरू असल्यामुळें दिनांक 1 जुलै 2024 पासून वेळापत्रकानुसार नियमित तासिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली आहे. तरी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. आर.बी.वाघुळदे व प्रवेश समिती चेअरमन डॉ.ए.के.पाटील यांनी केले आहे.